ETV Bharat / city

'राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू' - remdesivir supply

प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे. राज्यात आज (गुरुवारी) 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा समावेश आहे. गुजरात येथून 116.5 टन, भिलाई, छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.

राजेंद्र शिंगणे
राजेंद्र शिंगणे
author img

By

Published : May 6, 2021, 3:38 PM IST

मुंबई - राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सम प्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे. या रूग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. यासंदर्भात प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे. राज्यात आज (गुरुवारी) 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा समावेश आहे. गुजरात येथून 116.5 टन, भिलाई, छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा

रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते. वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा राज्यभर करण्यात येतो. राज्य शासनाद्वारे राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाढीव कोटा मिळावा, यासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत होता. राज्यासाठी वरील सात उत्पादक कंपनी मिळून एकूण 8 लाख 9 हजार 500 रेमडेसिवीरचा 21 एप्रिल ते 9 मे या कालावधीत मंजूर केलेला आहे. तसेच या कालावधीत 4 लाख 74 हजार 791 इतका साठा खासगी व शासकीय रूग्णालयांना वितरीत करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.