ETV Bharat / city

समुद्रकिनारी छटपूजाविषयक कार्यक्रम आयोजनावर बंदी; मार्गदर्शक सूचना जारी - छटपूजा 2020

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

chhatpuja
छटपूजा
author img

By

Published : Nov 17, 2020, 9:41 PM IST

मुंबई - उत्तर भारतीय समुदायाद्वारे साजरा होणारा छटपूजेचा सण येत्या शुक्रवारी व शनिवारी (२० व २१ नोव्हेंबर) साजरा केला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित संस्थांना सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या या महापालिकेच्या विभागस्तरावरुन देण्यात येणार आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : शिक्षण सचिवांना आली जाग; आज काढले कोरोना चाचणीच्या जबाबदारीचे पत्रक

बृहन्मुंबई महापालिकेद्वारे आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार छटपूजा ही समुद्र, तलाव, नदी किनारी सूर्यास्त व सूर्योदयाच्या कालावधी दरम्यान केली जाते. सदर पूजेदरम्यान जमा होणारे निर्माल्य पाण्यात विसर्जित केले जाते. या अनुषंगाने सर्व भाविक समुद्र, तलाव, नदी किनारी जमा होतात. सद्यस्थितीत मुंबई ‘कोविड-१९’ च्या महामारीचा सामना मार्चपासून करत असून, सध्या कोविडच्या दुसऱया लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने तसेच दरवर्षी छटपूजेदरम्‍यान समुद्र किनारी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी या वर्षी छटपूजा उत्सवाच्या आयोजनाबाबत महापालिकेने उपाययोजना करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.

सूचनांचे काटेकोरपणे पालन करा -

या सणाच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जीत करण्यासाठी समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची असलेली शक्यता लक्षात घेऊन यंदा विविध सण साजरे करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे इत्यादीबाबत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळी देखील करावे आणि बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱया सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन यानिमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

छट पूजेसाठी नियमावली -

  • हा सण साजरा करण्यासाठी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलीस विभागाने दक्षता घ्‍यावी.
  • छटपूजेसाठी सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या विभाग स्तरावरुन देण्यात येतील.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी, तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विभाग स्तरावर वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची चाचणी (Antigen / PCR Testing) करण्यात यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे.
  • अशा ठिकाणी ध्वनीप्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्‍लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.