ETV Bharat / city

शासनाचे आदेश धुडकावून ऑफलाइन उपस्थितीसाठी खासगी शाळांची सक्ती! - offline attendance of students

ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी आता विद्यार्थ्यांवर ऑफलाइन परीक्षेची सक्ती केल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Oct 18, 2021, 2:51 AM IST

मुंबई - ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी आता विद्यार्थ्यांवर ऑफलाइन परीक्षेची सक्ती केल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य सरकारच्या नियमांना हरताळ फासून काही शाळा विद्यार्थ्यांवर ऑफलाइनची सक्ती करत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

पालकांवर जाचक अटी-

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शाळेला उपस्थित राहणे शक्य नाही अशांसाठी सरकारने ऑनलाइन शिक्षणाची मुभा चालू ठेवावी असे आदेश दिले होते. मात्र, शासनाचे आदेश धुडकावून, काही शाळा विद्यार्थ्यांवर शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करत आहेत . विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवल्यानंतर शाळांनी अचानक ऑफलाइन परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. ज्यात पालकांना शाळेत उपस्थित राहणे शक्य नाही असे सांगत ऑनलाइन परीक्षेचा आग्रह धरला आहे. तसेच अशा पालकांवर जाचक अटी लागल्याचे समोर आले आहे.

काय आहे परिपत्रक-

दादरमधील अंटोनिओ दा सिल्वा शाळेच्या मुख्याध्यापकांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी दोन डिवाइस वापरावेत अशी सक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका मोबाईलवर अपलोड केल्यानंतर एक तासात उत्तरपत्रिका शाळेत पोहोचवण्याची सक्ती करण्यात आली आहे. मोबाईलवर उत्तरपत्रिका अपलोड केल्यानंतर शाळेत पोहोचवण्याची सक्ती का? असा सवाल पालकांनी विचारला आहे. तर सर्वसामान्य कुटुंबात एका विद्यार्थ्यासाठी दोन डिवाइस कसे आणायचे? असा प्रश्न पालकांपुढे पडला आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सुजन गोम्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तर पालिकेचे शिक्षणाधिकारीही बोलण्यास उपलब्ध होऊ शकले नाहीत.

हेही वाचा - ईडी, शिडी लावली तरी हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.