मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. "दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते आपल्या भूमिकेवर नेहमी ठाम असायचे. आयुष्यभर ते जनकल्याणासाठी अविरतपणे झटत होते." असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे कुशल व्यंगचित्रकार व शब्दांवर प्रभुत्व असलेले उत्कृष्ठ वक्ते होते. राजकारणावर त्यांची उत्तम पकड होती. महाराष्ट्राप्रती तळमळ असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!" असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळा अनावरणाला दिग्गजांची हजेरी; ठाकरे बंधू एकत्र येणार