ETV Bharat / city

सर्व जातीतील वंचितांना आम्ही संधी दिली - ओवैसी - MIM

यंदाच्या निवडणुकीला एमआयएमने 52 उमेदवार उभे केले असून, आम्ही वंचित, सर्व जातीतील संधी न मिळालेल्या लोकांना आपल्या पक्षातून तिकीट दिल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे. तसेच वंचित सोबत आमची युती काही जागांच्या वादामुळे झाली नसल्याचे मी व माझ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा सांगितल्याचे ते म्हणाले.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींची पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 5, 2019, 12:16 PM IST

Updated : Oct 5, 2019, 1:40 PM IST

मुंबई - यंदाच्या निवडणुकीला एमआयएमने 52 उमेदवार उभे केले असून, आम्ही वंचित, सर्व जातीतील संधी न मिळालेल्या लोकांना आपल्या पक्षातून तिकीट दिल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे. तसेच वंचित सोबत आमची युती काही जागांच्या वादामुळे झाली नसल्याचे मी व माझ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा सांगितल्याचे ते म्हणाले. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार इम्तियाज जलील व पक्षाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व जातीतील वंचितांना आम्ही संधी दिली - ओवैसी

2014 पासून 2018 मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज, जीएसटी, रोजगार, असे अनेक मुद्द्यांवर दिलेले आश्वासन सरकार पूर्ण करू शकलेले नसल्याने ते त्याबद्दल भाष्य करत नाहीत, असा ओवैसींनी आरोप केला. यावेळी आर्टिकल 370 चा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच माझी राजकारणातील भूक ही मोठी असल्याने मी पक्ष वाढवत जाणार आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा ओवैसी माझे 'गॉडफादर'; युतीच्या चर्चेसाठी आजही तयार - इम्तियाज जलील

निवडणुकीतील ईव्हीएम मशीनच्या वापराबद्दल प्रश्न विचारल्यावर, आमचे इम्तियाज जलील त्यानेच निवडणूक आल्याने मी ईव्हीएम संदर्भात बोलल्यास ते हास्यास्पद होईल, असे ते म्हणाले.

मुंब्रा, वर्सोवा तसेच इतर भागातील 2014 मधील पक्षाच्या उमेदवारांना यावेळी उमेदवारी दिलेली नसून, त्यांना विश्वासात घेऊन आम्ही मजबूत उमेदवार उभ केल्याचे ओवैसी यांनी सांगितले. मुस्लीम नागरिकांच्या आरक्षणासंदर्भात बोलताना, मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमने सर्वात जास्त मोर्चे आंदोलन काढले असून, आर्थिक, शैक्षणिक बाबींवर या समाजाला आरक्षण मिळाण्यावर आम्ही ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

Intro:फ्लॅश

एमआयएम प्रमुख अस्सदुद्दीन ओवेसी यांची मुंबईत पत्रकार परिषद

परिषदेला खासदार इम्तियाज जलील व महाराष्ट्र पदाधिकारी उपस्थित

52 उमेदवार महाराष्ट्रात उभे केलेले आहेत...

महाराष्ट्रात अभ्यास करून उमेदवार उभे केलेले आहेत..

आम्ही वंचित, सर्व जातीतील संधी न मिळालेल्या लोकांना आपल्या पक्षातून तिकीट दिल आहे जे बाबासाहेब आंबेडकर यांनी दुर्बल घटकांतील लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासानुसार..

महाराष्ट्रात सर्वच पक्षांमध्ये पक्षांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याला मी जबाबदार नाही ...त्याबद्दल मी काही बोलणार नाही

ज्यांच्यावर मुंबईची जबाबदारी आहे तेच सोडून जायच्या मार्गावर आहेत ...काँग्रेसला टोला ओवेसींनी दिला....

वंचित सोबत आमची युती काही जागांमधील वादांमुळे झाली नाही अनेक वेळा सांगितले आहे मी व माझ्या पक्षातील पदाधिकारीयांनी

2014 पासून 2018 मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.शेतकऱयांचे लोन, जीएसटी, रोजगार, अशे अनेक मुद्दे जे आश्वासन दिले होते ते सरकार पूर्ण करू शकले न नाही त्यावर ते भाष्य करत नाहीत..त्यामुळे 370 चा मुद्दा आहे घेऊन निवडणूक लढत आहेत सत्ताधारी...

आम्ही गेल्यावेळी ज्या भागात निवडणू आलोय तेथील समस्या सोडवण्यात आल्या आहेत अजून काही आहेत तेथील स्थानिक समस्या त्याही सोडवू...

लोकशाहीमध्ये सर्वाना उभं राहायचा हक्क आहे..मग महाराष्ट्रात पण राहिले उभे कोणी तर ते त्यांचं खासगी आहे मी काय बोलणार..सर्वाना शुभेच्छा ...आदित्य ठाकरेंच्या उमेदवारी ओवेसींनी दिले उत्तर

माझी राजकारणातील भूक ही मोठी आहे मी पक्ष वाढवत जाणार आहे....ही स्पेस जी आता झाली आहे ती माझ्यासाठी पुरे नाही....

ईव्हीएम मशीनला सर्वत्र सर्व विरोधी पक्ष विरोध करत आहेत.. आमचे इम्तियाज जलील त्यांनीच निवडणूक आलेत मी बोललो तर हास्यास्पद होईल ...

मुंब्रा, वर्सोवातील व इतर भागातील 2014 चे एमआयएमच्या उमेदवाराना यावेळी उमेदवारी दिलेली नाही...त्यांना विश्वासात घेऊन आम्ही मजबूत उमेदवारांना यावेळी उमेदवारी दिली आहे.. .

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमने सर्वात जास्त मोर्चे आंदोलन काढली ...आर्थिक, शैक्षणिक बाबींवर आरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज आहे त्यांना आरक्षण मिळावे यासाठी आजही आम्ही त्यावर ठाम आहोत....

Body:।Conclusion:।
Last Updated : Oct 5, 2019, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.