मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे भिजत असले, तरी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले (Preparations for election of Legislative Council) आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील, ना. गो. गाणार तर पदवीधर मतदार संघाचे डॉ. रणजित पाटील, डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाल 7 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाची जानेवारी २०२३ अखेर निवडणूक होणार (Teacher and Graduate Constituency Elections) आहे.
विक्रम काळे हे औरंगाबाद, बाळाराम पाटील कोकणातून तर ना. गो. गाणार हे नागपूरमधून शिक्षक मतदार संघातून निवडून आले आहेत. पदवीधर मतदार संघातून आमदार डॉ. पाटील हे अमरावती तर डॉ. तांबे हे नाशिकमधून निवडून आले आहेत. या पाचही आमदारांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची ७ जानेवारी २०२३ रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पारकर यांनी (Preparations for election started) दिली.
निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर -विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या या पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या शिंदे - फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादी - काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची असल्यामुळे निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू (Teachers and Graduate Constituencies) आहे.
नवीन मतदार याद्या - विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीची मतदार यादी वापरली जात नाही. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२२ रोजी नवीन यादी तयार करून २३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदार यादीचा प्रारूप मसुदा जाहीर केला जाणार आहे. तर ३० डिसेंबर २०२२ रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनाच मतदानाचा हक्क - विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी पदवी प्राप्त होऊन तीन वर्षे पूर्ण झालेल्या मतदाराला या मतदार यादीत आपले नाव नोंदवता येणार आहे, मात्र साधारण मतदार यादीत सदर व्यक्तीचे नाव असणे आवश्यक (Election of Legislative Council) आहे. तर शिक्षक मतदार संघांसाठी मतदार म्हणून मतदात्याने गेल्या सहा वर्षात किमान तीन वर्षे विद्यादान केलेले असावे. तसेच माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनाच मतदानाचा हक्क आहे, प्राथमिक शाळेतील शिक्षक मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकत नाहीत, असेही पारकर यांनी सांगितले. मतदारांच्या याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने पुन्हा एकदा मविआ आणि शिंदे फडणवीस यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.