मुंबई - सुपर मार्केटमध्ये दुकानांमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये ( MH cabinet decision on wine sale in supermarket ) घेण्यात आला आहे. या संदर्भामध्ये राजकारण तापले आहे. त्याबाबत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले ( Pravin Darekar slammed MH gov over wine ) की, दारू पिऊन कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या बेवड्यांना प्रोत्साहन देणारं हे सरकार आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, की अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आज सरकारने घेतलेला आहे. हे सरकार दारुड्यांची काळजी घेत आहे. उद्याची पिढी बरबाद होईल, याची चिंता या सरकारला नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर सुपर मार्केटमधे दुकानांमध्ये वाईन विकण्यास परवानगी ( Wine sale permission in shops in Maharashtra ) देणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसोबत सरकार व्याभिचार करत आहे, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. बेवड्यांना समर्पित असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सरकारला मंदिराची व शिक्षणाची अजिबात चिंता नाही. दारू पिऊन कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना सरकार प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर ( Pravin Darekar on MH decision on wine sale ) यांनी घेतला आहे. हे सरकार भरकटलेले असून भरकटले निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र सरकारने काय घेतला आहे निर्णय?
सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर्स, आणि 1000 चौरस फुटांपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही जनरल स्टोअर्स मध्ये राज्य सरकारने वाइन विक्रीला परवानगी दिली आहे. यामुळे वाईन विक्रीच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात आता सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर्स, आणि एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही जनरल स्टोअर्स मध्ये वाईन मिळणे सहज शक्य आहे.
'महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही'
महाराष्ट्र सरकारचा किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून टीका केली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, 'पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय, आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू, महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच, महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे, सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी अशी टीका ट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.