मुंबई - नाईक कुटुंबीयांशी ठाकरे कुटुंबाचे झालेल्या जमीन व्यवहाराच्या वादात किरीट सोमैया यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका केली होती, त्यानंतर त्या आरोपास प्रत्युत्तर देत सजंय राऊत यांनी किरटी सोमैया यांना आम्ही बोलावे असे काही महान कार्य किरीट सोमैया यांनी केलेले नाही. त्यांचा पक्ष देखील त्यांच्याकडे गांर्भीयाने बघत नाही. जुनी थडगी उकरायचे किरीट सोमैया यांनी बंद करावे. आम्ही जर हे काम केले तर सगळे सांगाडे त्यांचे सापडतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. आता या प्रकरणावरून भाजपचे विधान परिषद विरोधी नेते यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
कुणाची थडगी उकरण्याची भाषा करू नका-
दरेकर म्हणाले की, एका वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय केले आहे? संजय राऊत यांना रोज माध्यमांशी बोलल्या शिवाय चैन पडत नाही. एक वर्ष पूर्ण केले म्हणत आहेत. मात्र, त्यांनी एक वर्षात केले आहे. राज्यात अस्थीरता आहे, कोरोना आटोक्यात नाही, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळत नाही. सरकार पाडून दाखवा असे आवाहन त्यांच्याकडून दिले जाते, मात्र कोण यांचे सरकार पाडते आहे. स्वत':च आवाहन द्यायचे आणि स्वत:च फुशारक्या मारायच्या . या उलट यांनाच आता सरकार पडते की काय अशी भीती वाटू लागली आहे. ते स्वतः सरकार पडणार या भीतीने ग्रासले आहेत. तसेच त्यांना आता स्वतःच्याच सावलीची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी कुणाची थडगी उकरण्याची भाषा करू नये, असा इशारही त्यांनी दिला.
तर रक्तबंबाळ व्हाल-
तसेच ऑपरेशन लोटसचे काय झाले, सादे खर्चटले सुधा नाही, अशा टिमक्या संजय राऊत वाजतवत आहेत. मात्र भाजपने ठरविण्यास रक्तबंबाळ व्हाल. आम्हालाही तुमची थडगी उकरून काढता येतील. त्यामुळे उगाच कोणाला आव्हान देऊ नये, असाही इशाराही दरेकर यांनी यावेळी राऊत यांना दिला.