ETV Bharat / city

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ दर्शनात अटकाव, म्हणजे खोट्या मनोवृत्तीचे दर्शन - प्रवीण दरेकर

बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय नेतृत्व होते. त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेण्यासंदर्भात अडथळे निर्माण केले जाणार असतील, तर हे खोट्या मनोवृत्तीच्या लोकांचे काम असल्याचा टोला प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

author img

By

Published : Aug 18, 2021, 5:06 PM IST

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात उद्यापासून (19ऑगस्ट) होणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात करताना नारायण राणे मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन यात्रेची सुरुवात करतील, अशी माहिती या यात्रेचे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद जठार आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाण्यास शिवसेनेकडून नापसंती दर्शवण्यात आली आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय नेतृत्व होते. त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेण्यासंदर्भात अडथळे निर्माण केले जाणार असतील, तर हे खोट्या मनोवृत्तीच्या लोकांचे काम असल्याचा टोला प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे. नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले नेतृत्व आहे. त्यात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच ते मुंबईत येत आहेत. जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी देखील नारायण राणे यांना आशीर्वाद दिला असता, असेही प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

'कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आणि सरकारची'

जनआशीर्वाद यात्रेच्या ठरल्या कार्यक्रमाप्रमाणे नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन भेट देणार आहे. यावेळी कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्ष काळजी घेणार आहे. मात्र राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यातील पोलीस आणि सरकारची आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकार आणि पोलिसांनी काळजी घेणे जास्त गरजेचे, असल्याचे यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

'केवळ भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल'

जनआशीर्वाद यात्रा ही कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करूनच काढली जात आहे. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान देखील कोरोनाचे सर्व नियम पाळण्या संबंधी भारतीय जनता पक्ष काटेकोर पालन करणार आहे. मात्र तरीही केवळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून सभा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावेळेस कारवाई केली जात नाही, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला. त्यामुळे न्याय हा सर्वांना सारखाच असला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.

अशी असेल राणेंची जनआशीर्वाद यात्रा

19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट असे आठ दिवस नारायण राणे यांचा जनआशीर्वाद यात्रा असणार आहे. या आठ दिवसात मुंबईसह कोकणामध्ये नारायण राणे संवाद साधतील, अशी माहिती यात्रा प्रमुख प्रमोद जठार यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली. यात्रा प्रवास 9 लोकसभा मतदारसंघ, 33 विधानसभा मतदारसंघ आणि 05 जिल्हे (11 जिल्हाक्षेत्र) होणार आहे.

19 ऑगस्ट 2021 सकाळी 10 वाजता आगमन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा माल्यार्पण आणि वृक्षारोपण करणार. त्यानंतर सावरकर स्मारक, चैत्यभूमी व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक भेट.

20 ऑगस्टला जुहू समुद्र किनारा सफाई कामगार भेट आणि सन्मान व मुंबई उपनगर प्रवास, त्यानंतर सकाळी 10 वाजता अधीश बंगला प्रेस कॉन्फरेन्स, समता नगर, मालाड येथे समारोप

21 ऑगस्टला वसई विरार पालघर तालुका स्वागत, चिमाजीअप्पा पुतळ्याला माल्यार्पण

23 ऑगस्ट पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन प्रारंभ माणगाव मार्गे महाड येथे चवदार तळे येथे आगमन

24 ऑगस्ट सकाळी चिपळूण पूरग्रस्त परिसराची आढावा बैठक गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प भेट कारसेवकांचा सत्कार, वरिष्ठ संघ कार्यकर्ता सन्मान, संगमेश्वर कसबा संभाजी महाराज स्मारकास भेट, रत्नागिरी निवास

25 ऑगस्ट पतितपावन मंदिर भेट- सावरकर स्मारक भेट, लोकमान्य टिळक जन्मस्थान भेट, खारेपाटण, सिंधुदुर्ग येथे स्वागत कणकवली निवास, 26 ऑगस्टला कणकवली-देवगड-मालवण-कुडाळ मार्गे सावंतवाडीकडे प्रयाण व यात्रा समारोप.

हेही वाचा - राणेंसारख्या घरफोड्याला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊ देणार नाही - राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.