मुंबई - शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक शशिधरन यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये आज दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ईडीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.
ओमकार ग्रुपच्या दोन विकासकांची निर्दोष मुक्तता : टॉप्स ग्रुप सिक्युरीटी कंपनीने एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या करारात घोटाळा केल्या असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मूळ प्रकरणात ईओडब्ल्यूनं सादर केलेला सी समरी रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला आहे. त्यामुळे आता ईडीनं दाखल करून घेतलेल्या प्रकरणाला अर्थ उरत नाही असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पीएमएलए संदर्भात नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारावर दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालानुसार मुंबई सत्र न्यायालयानं नुकतीच ओमकार ग्रुपच्या दोन विकासकांची केलीय निर्दोष मुक्तता केले होते. मुंबई सत्र न्यायालयाकडून ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे.
काय आहे प्रकरण : टॉप्स कंपनीने MMRDA ला 500 सुरक्षा रक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी 70 टक्के सुरक्षा रक्षक कामावर येत होते. मात्र तरीही सर्वच 500 सुरक्षा रक्षकांचं वेतन काढलं जात असल्याचा आरोप रमेश अय्यर यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे FIR मध्ये केला होता.
सहा कंपन्यांना निविदा प्रक्रियेत मान्यता : MMRDA ने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेलेल्या अहवालात MMRDA ने 2013 ते 2017 आणि 2017 ते 2020 या सहा वर्षातील निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी सहा कंपन्यांना निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली. या सहा कंपन्यांपैकी एक टॉप्स सिक्युरीटी कंपनीही होती. टॉप्स सिक्युरिटीला MMRDA ने सुरक्षा रक्षक पुरवण्याचं जे कंत्राट दिलं त्या कंत्राटानुसार MMRDA ला सुरक्ष रक्षक पुरवण्यात आले. या टॉप्स सिक्युरिटी कंपनीने पुरवण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांप्रमाणे निविदा प्रकियेत नमुद केल्याप्रकारे निधी देण्यात आला असल्याचं या अहवालात म्हटलं होते.