मुंबई - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. निवडणुका पाहता भाजप आणि सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) यांनी निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. दोन्ही बाजूंनी शाब्दीक युद्धाचा आणि आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये भाजपाला किती जागा मिळतील याबद्दल भविष्यवाणी केली आहे. 200 जागा जिंकण्याचे लक्ष्य असलेल्या भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा त्यांचा दावा आहे.
भाजपला तिहेरी आकडा गाठता येणार-
एकीकडे भाजपने निवडणुकीची आक्रमक तयारी केली असतानाच, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल." म्हणजेच भाजपला तिहेरी आकडा गाठता येणार नाही. नाहीतर मी विश्लेषण करणे सोडेल, असं ते म्हणाले.
प्रशांत किशोर यांचा विश्लेषण धंदा की आवड-
यावर भाजप नेते व महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशांत किशोर यांचा विश्लेषण धंदा की आवड असं म्हणत प्रत्युत्तर दिले. प्रशांत किशोर विश्लेषण सोडणार असतील आणि त्यांचा तो व्यवसाय असेल. तर शेवटी कुटुंब त्यांचा चरीतार्थ देखील महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी विश्लेषण सोडावं, असे मी बोलनार नाही. मात्र त्यांना जर छंद आणि आवड असेल तर त्यांना विश्लेषण करणे सोडावचं लागेल, असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा- निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि भाजपात ट्वीटर वॉर
हेही वाचा- केंद्रीय पथकाला जाब विचारण्यासाठी जाणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात