ETV Bharat / city

Nitesh Rane Bail Rejected : नितेश राणेंच्या जामीन अर्जासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार - प्रसाद लाड - नितेश राणे अटकपूर्व जामीन

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन ( Nitesh Rane Bail Rejected ) अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ( Prasad Lad Tweet On Nitest Rane Bail Rejaction ) याबाबत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Nitesh Rane Bail Rejected
Nitesh Rane Bail Rejected
author img

By

Published : Dec 31, 2021, 7:26 AM IST

Updated : Dec 31, 2021, 7:45 AM IST

मुंबई - नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन ( Nitesh Rane Bail Rejected ) अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ( Prasad Lad Tweet On Nitest Rane Bail Rejaction ) याबाबत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्‍वास असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयातील जाणार आहोत, असे ट्वीट प्रसाद लाड यांनी केले.

Nitesh Rane Bail Rejected
प्रसाद लाड यांचे ट्वीट

'राणे कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय' -

संतोष परब मारहाण प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी नितेश राणे यांच्याकडून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर काल व आज असे दोन दिवस सुनावणी झाली. आज सत्र न्यायालयाने नितेश राणे यांची जामीन अर्जाची विनंती फेटाळून लावल्यानंतर आता यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांना जामीन मिळू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून ज्या पद्धतीने यंत्रणा लावण्यात आली होती. ते पाहता त्यांना आत अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असे सांगितले आहे. त्याच बरोबर न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्‍वास असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही सांगितले आहे.

प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन -

तत्पूर्वी, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ( Nitesh Rane Bail Rejected ) न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला. याविरोधात नितेश राणे हे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पोलीस फौजफाटा वाढवला

आमदार नितेश राणे हे अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नाहीत. त्यांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलिसांचे ( Sindhudurg District Police ) पथक गोवा आणि मुंबईत दाखल झाले आहे. आमदार नितेश राणे हे सोमवारी रात्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांना गोवा विमानतळावर ( Goa Airport ) भेटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यास जिल्ह्यातील वातावरण तापू शकते, हे लक्षात घेता जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कणकवलीमध्ये पोलीस कुमक वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, गर्दी टाळण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Last Updated : Dec 31, 2021, 7:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.