ETV Bharat / city

ओबीसींचा अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू- प्रकाश शेंडगे यांचा निर्वाणीचा इशारा - Maratha reservation Vs Dhangar Reservation

मराठा आंदोलनामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात दुफळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पार्श्वभूमीवर सरकारने या आंदोलनाला राज्यात कुठेही परवानगी देऊ नये, अशी मागणी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली.

प्रकाश शेंडगे
प्रकाश शेंडगे
author img

By

Published : Dec 1, 2020, 7:17 PM IST

मुंबई- राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही इतर समाजाच्या नेत्यांनी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्नही करू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज ' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.

मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये, याच मागणीसाठी आज 'ओबीसी आरक्षण बचाव' या नावाने महाराष्ट्र राज्य समता परिषदेकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. यासोबतच राज्यभरातील विविध ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणामध्ये मराठी मराठा समाजाने कोणतीही मागणी करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

हेही वाचा-...तर लढण्यासाठी पुन्हा एकत्र यावं लागेल - छगन भुजबळ

राज्यात 8 डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनातील अनेक नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे , अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात दुफळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पार्श्वभूमीवर सरकारने या आंदोलनाला राज्यात कुठेही परवानगी देऊ नये, अशी मागणी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. आम्ही 5 डिसेंबरला औरंगाबाद येथे एका परिषद आयोजन आहे. या परिषदेमध्ये या विरोधातील रुपरेषा आम्ही ठरवणार असल्याचेही शेंडगे म्हणाले.

हेही वाचा-ओबीसी आरक्षणाला तसूभर ही धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

मराठा समाजातील अनेक नेत्यांकडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी लावून धरली जात आहे. त्या विरोधात राज्यातील ओबीसींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

छगन भुजबळांनीही नुकतेच दिला इशारा

नाशिकमध्ये बोलताना नुकतेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते, की मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. आम्ही सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मात्र, काही जण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असून ही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.