ETV Bharat / city

काँग्रेसची अवस्था शिर नसलेल्या धडासारखी - प्रकाश आंबेडकर

लेाकसभा निवडणुकीत आमच्यापेक्षा काँग्रेसला मते अधिक‍ मिळाली असली तरीही सध्या आमची चलती आहे. त्यामुळे राज्यात आम्ही काँग्रेसला ४० जागांची ऑफर करत आहोत. त्यांनी ती स्वीकारावी अन्यथा आम्ही सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयार आहोत.

काँग्रेसची अवस्था शिर नसलेल्या धडासारखी - प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Jul 15, 2019, 8:51 PM IST

Updated : Jul 15, 2019, 9:02 PM IST

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस सोबतच्या आघाडी बाबत भाष्य केले.

सध्या राज्यात आणि देशातही काँग्रेसकडे केवळ धड राहिले आहे, डोके राहिलेले नाही. काँग्रेसचे संघटन तितके मजबूत राहिले नाही. यामुळे त्यांनी आम्ही दिलेल्या ऑफरचा स्वीकार करावा. अन्यथा आम्ही सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयार आहोत असे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेसची अवस्था शिर नसलेल्या धडासारखी - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या काळात केला होता. याचा वचपा विधानसभेला काढण्याचा प्रयत्न वंचित कडून होताना दिसत आहे. आंबेडकर यांनी, काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही पण काँग्रेसला आम्ही ४० जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय कळवावा, अन्यथा आम्ही २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत असे म्हटले आहे.

Intro:काँग्रेसला ४० जागांची ऑफर केलीय त्यांनी स्वीकारावी, अन्यथा आम्ही तयार आहोत- प्रकाश आंबेडकर Body:
काँग्रेसला ४० जागांची ऑफर केलीय त्यांनी स्वीकारावी, अन्यथा आम्ही तयार आहोत- प्रकाश आंबेडकर
(यासाठी मोजोवर प्रकाश आंबेडकर यांचे बाईट पाठवलेले आहेत, ते वापरावेत )
मुंबई, ता. १५ :
लेाकसभा निवडणुकीत आमच्यापेक्षा काँग्रेसला मते अधिक‍ मिळाली असली तरी सध्या आमची चलती आहे. त्यामुळे राज्यात आम्ही काँग्रेसला आम्ही ४० जागांची ऑफर केली आहे, त्यांनी ती स्वीकारावी अन्यथ आम्ही सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयार असल्याचे सुतोवाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात त्यांना प्रश्न केला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात आणि देशातही सद्या काँग्रेसकडे केवळ धड राहिले आहे, डोके राहिलेले नाही, अशी स्थिती आहे. त्यातच आता काँग्रेसकडे त्यांचे संघटन मजबूत राहिले नाही. यामुळे त्यांनी आम्ही दिलेल्या ऑफरचा स्वीकार करवा आणि त्यासाठी पुढे काय निर्णय घायचा तो घ्यावा, असा सल्लाही आंबेडकर यांनी काँग्रेसला आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
लोकसभा निवडणुकीत आम्ही एमआयएमसोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेसाठीही आम्ही एकत्र निवडणुका लढविणार असल्याचे ठरविले आहे. दरम्यान काही माध्यमात एमआयएम ने आमच्याकडे १०० जागांची मागणी केल्याचे म्हटले असले तरी , तशी काही मागणी ही माझ्याकडे आलेली नाही नसल्याचे स्पष्टीकरण आंबेडकर यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन या हॅकिंग होत नाही, त्यात फेरफार करता येत नाही असे स्पष्टपणे जाहीर केले होते. त्यावर आम्ही विश्वास ठेवला होता. परंतु मतमोजणीनंतर जे काही चित्र समोर आले त्यातून आमचा आता संशय वाढला असल्याने यासाठी न्यायालयानेच यावर बाजू समोर आणावी अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. त्यामुळेच राज्यात लोकसभेच्या ४८ जागांपैकी अनेक ठिकाणी मतमोजणी नंतर कमी आणि जास्त मते झाल्याचे समोर आले असून त्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर या खंडपिठात ३१ याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर लवकर सुनावणी व्हावी अशी आमची मागणी असल्याचेही आंबेडकर म्हणाले.
ज्या लोकसभा मतदार संघात मतमोजणीनंतर जास्त मते निघाली तिथे निकाल जाहीर करता येत नाही, त्याची माहिती आयोगला दिल्यानंतर मतमोजणी अधिकारी देतो, त्यानंतर आयोग निर्णय घेतो, परंतु तसे झाले नाही. यामुळे जिथे जास्त मते निघाली तिथे निकाल जो जाहीर करण्यात आली ती बेकायदेशीर आहेत, त्यामुळे या निवडणुका रद्द कराव्यात, लोकांचा अजूनही विश्वास आहे, त्यामुळे आता न्यायालयाने आमच्या याचिकांवर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निकाल द्यावा तसेच देशात यापुढे बलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशा आमच्या मागण्या असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.