ETV Bharat / city

मुंबई - पालिका रुग्णालयांत ३० टक्के पदे रिक्त, कोरोनाकाळात आरोग्य सेवेवर परिणाम - Nitai Mehata on BMC health infra

मुंबईमध्ये कोरोनाच्या लढ्यासाठी आरोग्य सेवेत 30 टक्के कर्मचारी कमी आहेत. दुसरीकडे कोरोनापेक्षा इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात म्हटले आहे.

संग्रहित -
संग्रहित -
author img

By

Published : Sep 23, 2020, 8:16 PM IST

मुंबई – देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या मुंबईत कोरोना योद्ध्यांची म्हणजे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये एकूण 30 टक्के पदे रिक्त आहेत. महापालिकेने पदभरतीकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका कोरोनाच्या आपत्तीकाळात आरोग्य सेवेवर झाल्याचा आरोप प्रजा फाऊंडेशनच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.

महापालिकेची विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचार्‍यांची ४७ टक्के आणि पॅरामेडिकलची ४३ टक्के पदे रिक्त आहेत. हे प्रमाण एकूण पदांच्या तुलनेत ३० टक्के इतके आहे. ही माहिती प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या ‘मुंबईतील आरोग्याची सद्यस्थिती’ अहवालात नमूद केली आहे. महापालिकेने कामात सुधारणा करून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज अहवालात अधोरेखित केली आहे. अक्षम पायाभूत संरचना, अपुरे मनुष्यबळ आणि अर्थसंकल्पाचा अकार्यक्षमपणे वापर ही आरोग्य व्यवस्थेची स्थिती आहे. नागरिकांना एरवी भेडसावणार्‍या रोगांवरील उपचार व्यवस्थाही सुरळीत चालण्यामध्ये अडचणी येत असल्याचे मत प्रजा फाऊंडेशनचे विश्वस्त निताई मेहता यांनी मांडले.

रुग्णालयात पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेला फटका -
कोरोनामध्ये मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये आणि पेरीफेरीयल रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णालयामधील कर्मचार्‍यांचे अपुरे मनुष्यबळ याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ८८१ वैद्यकीय पदे मंजूर आहेत. त्यातील फक्त ३३७ पदेच भरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पॅरामेडिकलची २ हजार ६९६ मंजूर पदे असताना केवळ १ हजार ५०२ पदे भरली आहेत. नर्सिंग स्टाफची पदे ५ हजार ४११ पैकी असताना ४ हजार ७०७ पदे भरली आहेत. रुग्णालयांमधील ८ हजार ९६७ कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ६ हजार १२४ पदेच भरण्यात आली आहे.

डिस्पेन्सरीमध्येही 30 टक्के पदे रिक्त -
पालिकेच्या डिस्पेन्सरीमध्येही कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ कमी आहे. डिस्पन्सेरीमध्ये ७७९ वैद्यकीय पदांपैकी ५४८ पदे भरली आहेत. त्याचप्रमाणे पॅरामेडिकलच्या ८८४ पैकी ५४३, नर्सिंग स्टाफ १८९५ पैकी १४०३ पदे भरली आहेत. तसेच ५ हजार ८४२ कर्मचार्‍यांच्या पदांपैकी ४ हजार १३ पदेच भरली आहेत. पालिकेचे रुग्णालये आणि डिस्पेन्सरी अशा दोन्हीमध्ये २१ हजार ३८ पदांपैकी १४ हजार ६४५ पदे भरलेली आहेत. रिक्त असलेले पदांचे प्रमाण हे एकूण पदांच्या तुलनेत ३० टक्के इतके आहे.

१ लाख व्यक्तींमागे फक्त ७३ कर्मचारी -
२०३० पर्यंत एक लाख व्यक्तींमागे ५५० वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफ उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या मुंबईमध्ये हे प्रमाण ७३ वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफ इतके आहे. इतक्या कमी प्रमाणात असलेल्या कर्मचार्‍यांच्या संख्येमुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करताना आरोग्य सेवेवर प्रचंड ताण आल्याचे अहवालात म्हटले आहे.

आरोग्यावरील निधीचा वापरच नाही -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडवली खर्चाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीचा वापर काही वर्षांपासून सातत्याने कमी होत राहिला आहे. २०१६-१७ मध्ये अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीपैकी ७३ टक्के रक्कम वापरली नव्हती. हेच प्रमाण २०१८-१९ मध्ये ५४ टक्के इतके होते, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.

कोरोनापेक्षा अन्य आजाराने रुग्णांचे मृत्यू
कोरोना काळात अनेक रुग्णांचा मृत्यू अन्य आजाराने झाले आहेत. मार्च ते जुलैदरम्यान ४४ हजार ८८७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १३ हजार ८३३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडल्यांची संख्या ९५७ आहे. तर मे २०१९ मध्ये ६ हजार ८३२ मृत्यू झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६ हजार ४४ अधिक मृत्यू झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.