मुंबई : बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'प्रधानमंत्री कुसुम योजना' मान्य करण्यात आल्याची माहिती आज उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. २०१९-२० ते २०२२-२३ या कालावधीसाठी उर्जा विभागाकडून ही योजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच, त्यांनी आपल्या एक वर्षाच्या कारकीर्दीचा लेखाजोखाही मांडला, तसेच येत्या कार्यकाळासाठी विविध घोषणाही केल्या.
राज्यात ३०० मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प राबवण्यासाठी टास्क फोर्स तयार केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच एक लाख पारेषण विरहित कृषी पंप करणार, शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देणार, सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकरी, संस्था, ग्रामपंचायत यांनाही सहभागी होता येणार अशा विविध घोषणा त्यांनी केल्या.
आपल्याला उर्जा खाते मिळून एक वर्ष पूर्ण झाल्याचे राऊत यांनी सांगितले. या एका वर्षात आपण राज्यात विविध प्रकल्प आणल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळासाठी काही धोरणे आम्ही निश्चित केली आहेत. तसेच, विविध दीर्घकालीन योजना आम्ही तयार करत आहोत असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : आर्थिक गुन्हे शाखेची भाजपा आमदार प्रसाद लाड यांना नोटीस