मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरण अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींची डीएनएन चाचणी करण्यात आली. त्याकरीत एक टीम एनआयए कार्यालयात पोहोचली होती. एनआयएकडे असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए चाचणी तपासली जाणार आहे.
काय आहे मनसुख हिरेन प्रकरण -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासांत पुढे आले होते. त्यानंतर मनसुख हिरेन त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने यापूर्वी 7 जणांना अटक केली होती. आज पुन्हा 3 जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 10 झाली आहे.
कोण आहे प्रदीप शर्मा -
प्रदीप शर्मा हे 1983 पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. एन्काऊटंर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. मुंबई पोलीस दलात असताना त्यांनी 113 गँगस्टरचे एन्काऊटंर केल्याची नोंद आहे. तसेच 2010 मध्ये लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात त्यांना अटक झाली होती. तर 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले होते. त्यांना प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात रूजू करण्यात आले. 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती. त्यासोबतच त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा - काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढवणार, आघाडी कायमस्वरुपी नाही - पटोले