ETV Bharat / city

31 जुलैपर्यंत एमपीएससीची सर्व पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा - etv bharat maharashtra

एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत सोमवारी चांगलाच गाजला. यावरील चर्चेला उत्तर देताना एमपीएससीची सर्व पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनात केली.

31 जुलैपर्यंत एमपीएससीची सर्व पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

author img

By

Published : Jul 5, 2021, 12:05 PM IST

Updated : Jul 5, 2021, 1:59 PM IST

मुंबई : एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत सोमवारी चांगलाच गाजला. यावरील चर्चेला उत्तर देताना एमपीएससीची सर्व पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनात केली.

31 जुलैपर्यंत एमपीएससीची सर्व पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

एमपीएससीच्या मुद्द्यावर चर्चा करा - फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा सदनात उपस्थित केला. सदनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल केला. सर्व मुद्दे बाजुला ठेवून एमपीएससीच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे, जेणेकरून आणखी स्वप्नीलचे बळी जाणार नाही असे फडणवीस म्हणाले.

स्वप्नीलच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या-मुनगंटीवार

तर सुधीर मुनगंटीवार यांनीही हा मुद्दा उपस्थित करत, एमपीएससीची तयारी करणाऱ्या 403 विद्यार्थ्यांनीही आत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती सदनात दिली. तसेच स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची मदत देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. बारा आमदारांच्या नियुक्तीची सरकार सातत्याने मागणी करते, मात्र एमपीएससीची पदे भरता आली नाही अशी टीकाही त्यांनी केली.

31 जुलैपर्यंत सर्व पदे भरणार - अजित पवार

दरम्यान या चर्चेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीची सर्व पदे भरणार असल्याची घोषणा केली. स्वप्नीलच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी सदनात दिली.

हेही वाचा - विधानसभेचे पावसाळी अधिवेशन : वाचा, कोणते मुद्दे असतील केंद्रस्थानी?

Last Updated : Jul 5, 2021, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.