ETV Bharat / city

Bmc election - विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या २ जागांसाठी तिरंगी निवडणूकीची शक्यता

मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेवर सदस्य निवडून जाण्यासाठी पहिल्या फेरीत जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे. हा मतांचा कोटा शिवसेना आणि भाजपकडे आहे. यामुळे शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे यांना तर भाजपकडून माजी आमदार व पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Bmc election
Bmc election
author img

By

Published : Nov 21, 2021, 3:23 PM IST

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर सदस्य निवडून दिले जातात. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर दोन सदस्य निवडून दिले जातात. यासाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र संख्याबळ कमी असले तरी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याची चाचपणी केली जात आहे. यासाठी सोमवारी मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील संख्याबळ -
मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेवर २०१६ मध्ये काँग्रेसकडून भाई जगताप तर शिवसेनेकडून रामदास कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेकडे संख्याबळ असल्याने भाई जगताप आणि रामदास कदम हे दोघेही निवडून आले होते. २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, भाजपचे ८२ तर काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडून आले आहेत. अपक्ष नगरसेवक आणि मनसेच्या ६ नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या निवडणुकीत स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ ९९ तर भाजपचे संख्याबळ ८३ झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य ४७ नगरसेवक मतदार आहेत.

निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता -
मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेवर सदस्य निवडून जाण्यासाठी पहिल्या फेरीत जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे. हा मतांचा कोटा शिवसेना आणि भाजपकडे आहे. यामुळे शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे यांना तर भाजपकडून माजी आमदार व पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते राजहंस सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा असल्याने शिवसेना आणि भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. मात्र, काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसने उद्या सोमवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत उमेदवार देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली. काँग्रेसने उमेदवार दिल्यास ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत राजहंस सिंग -
भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले राजहंस सिंग हे सर्वप्रथम १९९२ मध्ये मुंबई पालिकेत नगरसेवकपदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वर्ष १९९२ ते १९९७ ते नगरसेवक होते. २००२ पासून २०१२ पर्यंत सलग बारा वर्षे ते काँग्रेसचे नगरसेवक होते. या कालावधीत वर्ष २००४ पासून वर्ष २०१२ पर्यंत सलग आठ वर्ष ते विरोधी पक्ष नेते होते. याच दरम्यान वर्ष २००९ मध्ये दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसकडून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. २००९ ते २०१४ ते विधानसभा सदस्य होते.
वर्ष २०१७ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून भाजचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई भारतीय जनता पक्ष आयोजित मुंबईतील चौपाल कार्यक्रमात त्यांची भूमिका अग्रेसर राहिली आहे.

कोण आहेत सुनिल शिंदे -
शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे हे सन २००७ ते २०१२ या कालावधीत नगरसेवक होते. याच कालावधीत त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविले. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते वरळी मतदार संघातून निवडून आले होते. पाच वर्षे आमदारपदी राहिल्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती. पण ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातूनच निवडणूक लढवायची असल्याने सुनील शिंदे यांना वरळी विधानसभा मतदारसंघाचा त्याग करावा लागला होता. या त्यागाचे फळ म्हणून त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा - Kolhapur TET Exam : कोल्हापुरात अनेक टीईटी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ; वेळेत न आल्याचे सांगत गेट बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.