मुंबई बंडखोर आमदार दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यानंतर राजन साळवी Rajan Salvi to Join Shinde faction हे शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या ते संपर्कात असल्याचे समजते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच साळवी यांनी भेट घेतल्याने Rajan Salvi Met Deputy CM उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे.
कोकणात एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमुळे शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. आता राजन साळवी ही शिंदे गटात Shinde faction group update सामील होणार असल्याच समजते. साळवी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र तेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेला लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदार संघाचे राजन साळवी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते आहेत.
काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत कोकण दौऱ्यावर Udaya Samant Kokan Visit होते. त्यांनी देखील रिफायनरीबाबत अनुकूल भूमिका घेतली. या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्मिती होईल, असं मत त्यांनी मांडले होते. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला आहे. तर आमदार राजन साळवी यांनी अधिक आक्रमकपणे या प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यामुळे साळवी शिंदे गटात जाण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते.
सलग तीन वेळा आले आहेत निवडून - राजन साळवी हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून कोकण, महाराष्ट्र, भारतातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेवर 2009, 2014 आणि 2019 साठी सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
रत्नागिरी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिल, असा व्यक्त केला होता विश्वास शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही. ही विचारांची चळवळ आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार पुढे घेवून जाणारी हि चळवळ आहे. त्यामुळे ती कधीही संपणार नाही. बाळासाहेबांचे विचार नेते, लोकप्रतिनिधी नव्हे तर सर्वसामन्य शिवसैनिक पुढे घेवून जात आहे. त्यामुळे शिवसेना संघटन दिवसेंदिवस अधिकच मजबूत होत जाईल असा विश्वास साळवी यांनी नुकतेच व्यक्त केला. कोण इकडचा तिकडे गेला म्हणून शिवसेने संपत नसते. शिवसेना हा विचार ग्रामीण भागासह तळागाळात रुजलेला आहे. जिल्ह्यात संघटना मजबूत आहे. हा बालेकिल्ला आजही असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता.