मुंबई -कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्याही कमी झाली आहे. यामुळे मुंबईमधील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. मुंबईत ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट होता. एकाच आठवड्यात तो ४.४० टक्के इतका झाला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना विषाणुचा संसर्ग सुरू झाला. यावर्षी जानेवारी, फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रसार कमी झाला. यामुळे मुंबईमधील लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली. याचा परिणाम गर्दी वाढल्याने कोरोनाचा पुन्हा प्रसार वाढला. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली. मुंबईत 7 ते 11 हजारापर्यंत रोज रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या पुढे गेला होता.
हेही वाचा-Maharashtra Breaking : बेलापूरच्या किल्ल्याचा ऐतिहासिक टेहळणी बुरुज ढासळला
पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला -
महापालिकेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांमुळे मागील आठवड्यात ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. सध्या हा रेट ४.४० टक्के इतका कमी आहे. गेल्या आठवड्यात २ लाख ६९ हजर ५६९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईमध्ये सध्या १२ हजर ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण आहेत. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त आहेत. मुंबईमधील एकूण बेड्स पैकी २७.१२ टक्के बेड्सवर रुग्ण आहेत.
हेही वाचा-नाशिक -बिबट्याकडून घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार; थरार सीसीटीव्हीत कै
मुंबईत तिसऱ्या स्थराचे निर्बंध -
ब्रेक द चेन अंतर्गत पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला आहे. मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला असला तरी शहरातील लोकसंख्या, दाटीवाटीने राहणारे लोक, लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करून येणारे प्रवासी, हवामान खात्याने येत्या काही दिवसात दिलेला अतिवृष्टीचा इशारा अशी प्रतिकूल स्थिती आहे. कारणांमुळे सध्याचे निर्बंध लागू राहतील, असे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आदेश काढले आहेत.
सध्या हे निर्बंध कायम राहणार -
सध्या मुंबईत तिसऱ्या स्थराप्रमाणे सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद आहेत. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत आहेत. महत्त्वाची खाजगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू आहेत. तर, शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू आहेत. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी, महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50% उपस्थिती, केवळ बांधकामस्थळी राहून काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना कामाची मुभा आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल, तर पाच वाजेच्या नंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमता नुसार सुरू आहे. लोकल ट्रेनमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिलांना प्रवेश द्यावा, असे नमूद केले आहे. मात्र, महिलांना अशी सूट दिली जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.