मुंबई - सध्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाण्यांप्रमाणे आता सोशल मीडियावर राजकीय पक्षांवर आधारीत असलेली गाणी लोकं मोठ्या प्रमाणात ऐकत आहेत. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस यांसारख्या पक्षांवर आणि पक्षांच्या नेत्यांवरील गाणी सध्या सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहेत. आता निवडणूक संपली तरी ही गाणी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. लोकं आवडीने गाणी ऐकत असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा - गर्भपात केलेले भ्रूण खाल्ले मांजरीने, अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे महापौरांचे आश्वासन
लोकांच्या फेसबुक, व्हाॅट्सअप आणि इतर सोशल मीडियावर अॅप्सवर राजकीय गाणी मोठ्या प्रमाणात अजूनही पाहायला मिळत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, मनसे या महाराष्ट्रातील सर्वच पक्षांची गाणी तसेच नेत्यांची गाणी सोशल मीडियावर लोकं ऐकण्यासाठी सर्च करत आहेत. या राजकीय पक्षातील नेत्यांवरील व पक्षावरील गाण्यांचे प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. या गाण्यांचा व्हिवज लाखो आणि मिलियनमध्ये गेलेले दिसून येत आहे.
हेही वाचा - तीन चाकी सरकारचे पहिल्याच दिवशी 'असत्यमेव जयते', शेलारांचा निशाणा
- शिवसेनेच्या अधिकृत गाण्याला आतापर्यंत दोन मिलियन 20 हजार लोकांनी पसंती दिली आहे.
- मनसेच्या गाण्याचे व्हिवज चार मिलियन 20 हजार.. तसेच गेल्या महिन्यातच आलेल्या राजू रतन पाटील या मनसेच्या एकमेव आमदारावर बनवलेल्या गाण्याला प्रचंड प्रतिसाद म्हणजेच तीन मिलियन 90 हजार व्हिवज आहेत.
- काँग्रेसच्या गाण्याचे व्हिवज तीन लाख तसेच गेल्या महिन्यातच आलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या बनवलेल्या गाण्याला साडे चार लाख लोकांनी बघितले आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाण्याला 18 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. तसेच राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे गाणेही मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये आहे.
- भाजपच्या गाण्याला 12 लाख 43 हजार लोकांनी बघितले आहे.
- वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या गाण्याला 11 लाख 18 हजार इतके व्हिवज आहेत.
प्रत्येक पक्षातील आमदारांनी आपली स्वतंत्र गाणी निवडणुकीच्या प्रचारासाठी बनवलेली होती. त्यातील आतापर्यंत मनसे आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांची गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची अधिकृत गाणी लोकं आवडीने पाहत आहेत. तसेच प्रत्येक पक्षांवर अनेक गाणी बनलेली आहेत. त्यातील ठरावीकच गाणीच प्रेक्षक पसंत करत आहेत. तसेच अधिकृत गाणी ही वेगवेगळ्या चॅनेल्सवरून अपलोड झाल्याने प्रत्येक गाण्यांचे व्हिव वाढलेले आहेत. ते एकत्रित मोजता येत नाहीत, पण सोशल मीडियावर राजकीय गाणी आजही लोकप्रिय आहेत हे मात्र नक्की.