ETV Bharat / city

मनसेच्या अपयशाचे 'राज', बदलेल्या भूमिकांही 'बुमरॅंग' - बुमरॅंग

मनसेची स्थापना होऊन सुमारे 15 वर्षांचा कालखंड उलटून गेला. पंधरा वर्षांच्या काळात राज यांनी घेतलेल्या अनेक भूमिका घेतल्या. त्या तडीस नेण्याऐवजी सातत्याने भूमिका बदलत राहिले. या बदललेल्या भूमिका मनसेवरच बुमरॅंग झाल्याचे आजवर दिसून येत आहेत. अयोध्या दौऱ्यावरुन घेतलेली माघार मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांच्याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मनसेच्या अपयशाचे 'राज'
मनसेच्या अपयशाचे 'राज'
author img

By

Published : May 21, 2022, 5:49 PM IST

मुंबई - मनसेची स्थापना होऊन सुमारे 15 वर्षांचा कालखंड उलटून गेला. पंधरा वर्षांच्या काळात राज यांनी घेतलेल्या अनेक भूमिका घेतल्या. त्या तडीस नेण्याऐवजी सातत्याने भूमिका बदलत राहिले. या बदललेल्या भूमिका मनसेवरच बुमरॅंग झाल्याचे आजवर दिसून येत आहेत. अयोध्या दौऱ्यावरुन घेतलेली माघार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आवाजातील करारी बाणाने अनेक विषयांवर ठाम भूमिका मांडता दिसतात. सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होते. पंण, मत परिवर्तनात ही गर्दी दिसत नाही. मनसेच्या पक्ष स्थापनेनंतर राज यांना तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतले. बारा आमदार, २७ नगरसेवक आणि नाशिक महापालिकेची सत्ता हातात दिली. पण, राज ठाकरे यांच्या फटकळ स्वभावामुळे मनसेची अधोगतीला लागली. राज यांनी अनेकदा मोठ्या वल्गना केल्या. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे दिसतांच वारंवार भूमिका बदलल्या. मनसेच्या जडणघडणीपासून आजतागायत राज यांनी मनसेला उभारी देण्याऐवजी इतर पक्षांचे भोई झाल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यात प्रादेशिक पक्षाच्या शर्यतीत असण्याऐवजी मनसे आज चाचपडताना दिसत आहे. अयोध्या वारीला जाण्याची घोषणाही भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या प्रखर विरोध समोर राज निष्पभ्र ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज यांच्याविरोधात तर्कवितर्क रंगवले जात आहेत.

मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा गुढीपाडवा सभेतून राज ठाकरे यांनी देत शिवाजी पार्कचे मैदान मारले. राज्यात यानंतर भोंग्याचा विषयावर राजकारण तापले. तर ठाण्यात सभा घेत, अयोध्येला जाण्याची घोषणा केली. प्रखर हिंदुत्वावादी असलेल्या शिवसेनेपुढे आव्हान निर्माण करण्यात प्रयत्न केला. भाजपने याचा फायदा घेत, राज यांच्या भूमिकेचे स्वागत केले. राज यांचा वाढता प्रभाव जाणवू लागताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार आसूड ओढले. राज्यातील वातावरण त्यानंतर ढवळून निघाले.

झेंडा बदलला - मनसेची स्थापना झाली त्यावेळी धर्मनिरपेक्ष झेंडा होता. वर निळा मध्यभागी भगवा व तळाला हिरवा रंग होता.या दोन रंगांपेक्षा थोडा मोठा भगवा रंग होता. खळखट्याक मनसे स्टाईल महाराष्ट्रात नव्याने जन्माला आली. राज ठाकरे यांनी झेंडा बदलून प्रखर हिंदुत्त्वाची वाटचाल सुरू केली. नव्याने तयार केलेल्या मनसेच्या झेंड्यात आता संपूर्ण भगवा रंग आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. मनसेला उभारी देण्यासाठी मनसेने नवे प्रयोग केले आहेत. या प्रयोगाला खरंच यश मिळते, का ते पहावे लागेल.

विचारसरणीत बदल - मराठीचा मुद्दा हाती घेत, राज ठाकरे यांनी मनसेच्या वाटचालीला सुरुवात केली. परप्रातियांवर टीका करत कट्टर मराठी भाषावादी असल्याचे दाखवून दिले. सध्या मशिदीवरील भोंगा, हनमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करत राज यांनी हिंदुत्वाची कास धरली आहे. अंगावर भगवी शाल पांघरलेले राज ठाकरे आज पहायला मिळतात. एकेकाळी धर्मनिरपेक्ष असलेला पक्ष हिंदुत्वाच्या दिशेने निघाला आहे. राज यांच्या आजवरच्या विचारसरणीत पूर्णपणे बदल झाला आहे. राज्यातील जनता राज यांना खरंच साथ देईल का, ते पहावे लागेल.

संघटनात्मक बांधणी अभाव - राज्यात मनसे स्थापन झाल्यानंतर राज यांच्यासोबत अनेक कट्टर शिवसैनिक गेले. शिवसेनेला त्यावेळी मोठी भगदाड पडली होती. अनेकांनी शिवसेना संपली, असे भाकित वर्तवले होते. मनसेत निराश झालेल्या शिशीर शिंदे, प्रकाश पाटणकर, दिलीप लांडे, आदित्य शिरोडकर आदी राज यांचे कट्टर समर्थकांनी काहीच वर्षात शिवसेना पक्षात घरवापसी केली. राम कदम, प्रविण दरेकर, मंगेश सांगळे आदींनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राज ठाकरे यांची संघटनात्मक बांधणीचा अभाव असल्याने मनसेची आजची स्थिती डळमळीत झाली आहे.

टोल नाक्याचे आंदोलन अपयशी - नागरिकांना भेडसावणाऱ्या टोल विरोधात मनसेने आंदोलन हाती घेतले. टोल नाके यावेळी मनसेकडून फोडण्यात आले. त्यामुळे टोलच्या प्रश्नांवर त्रस्त झालेल्या लोकांना मनसेबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, टोल नाक्याचा मुद्दा मनसेने सोडून दिल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडली.

उत्तर भारतीयांना मारहाण - मराठी मुलांना नोकरीत प्राधान्य देण्याची भूमिका मांडत मनसेने अनेक आंदोलने केली. रेल्वेच्या कामगार भरतीत मराठी मुलांना डावलल्याने उत्तर भारतीय मुलांना बेदम मारहाण केली. राज्यभरात रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी अर्ज जमा केले. महाराष्ट्रातील जनतेने यामुळे राज यांच्या भूमिकेचे स्वागत करत विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भरघोस प्रतिसाद दिला. हे यश राज ठाकरे यांना टीकवता आलेले नाही.

लाव रे तो व्हिडिओ - लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठिंबा देत, भाजपवर सडकून टीका केली. लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष मोदींच्या कामकाजाची पोलखोल केली. भाजपला देशात दंगली घडवायच्या आहेत, असा थेट आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. तसेच निवडणुकीच्या पूर्वी ईव्हीएम मशीनच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एकत्र आणले. मात्र, राज यांना आपल्या भूमिकेचे विस्मरण झाले असून सध्या भाजपला पोषक वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

फेरीवाला आंदोलन फेल - रस्त्यांवरील बेकायदा फेरीवाल्यांचा मुद्दा मनसेने हाती घेत, रान उठवले. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांना मारहाणीच्या घटना घडल्या. मात्र, काहींच दिवसांत हा मुद्दा मागे पडला. मनसेनेही त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते.

मशिदीवरील भोंगे आणि हिंदुत्व - गुढीपाडव्याच्या सभेत राज यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा पेटवला. संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले. भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम दिला. या मुद्द्याची झळ मुस्लिम धर्मियांना बसेल, अशी अटकळ राज यांनी बांधली होती. पण, भलतेच झाले. हिंदू धार्मिक स्थळांना याचा फटका बसत आहे.

अयोध्या दौऱ्याची घोषणा आणि माघार - राज ठाकरे अयोध्येला जाणार असे वातावरण तयार केले. हिंदुजननायक अशी प्रतिमा तयार करण्यात आली. परंतु, भाजपचे खासदार बृजभूषण यांनी राज यांना कडाडून विरोध केला. तरीही राज अयोध्येत जातीलच, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रकृतीचे कारण देत, राज यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. त्यामुळे पुन्हा राज यांच्या विश्वासाहर्तवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज यांच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड - राज यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची घोषणा राज यांनी केल्यानंतर सोशल माध्यमातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अनेक मीम्स बनू लागले. राज यांच्यावर दिनक्रमावरुनही विविध पोस्ट व्हायरल होत आहेत.

धरसोड वृत्ती कारणीभूत - मनसेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाली. नाशिकमध्ये सत्ता मिळाली. मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, रत्नागिरी खेडमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली. मोठ्या प्रमाणात युवावर्ग, नवीन पिढी प्रस्तापितांपेक्षा त्यांच्याकडे आकर्षित झाला. पुढे राज यांना त्यात सातत्य राखता आले नाही. परिणामी, पुढील काही वर्षात पक्षाची वाताहत झाली. अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यात राज यांची सातत्याने बदलली जाणारी भूमिका कारणीभूत होती. कधी मोदींविरोधात, कधी राष्ट्रवादी, कॉंग्रेस विरोधात भूमिका मांडल्या. कधी अचानक सभा जाहीर केल्या. सभांना मोठी गर्दी होते, त्याचे मतांमध्ये रुपांतर होत नाही. राज ठाकरे हे चांगले वक्ते आहेत. पण, पक्षाची बांधणी करण्यात अपयशी ठरले. आता मराठी सोडून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन रान उठवले आहे. अयोध्येला जाण्याची घोषणा केली. रेल्वे बूक केली. मात्र, दौरा रद्द करुन ते पुन्हा एकदा कोंडीत सापडले आहेत. राज यांची आजवरची भूमिका, धरसोड वृत्ती, नेतृत्वाबद्दल अविश्वाचे वातावरण, राजकारणात पक्षाला लागणारा प्रोग्राम आणि सातत्य ठेवण्यात ही राज अपयशी ठरल्याचे, राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी सांगितले.

हेही वाचा - water cut in Mumbai : मुंबईत चार दिवस पाणी कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.