ETV Bharat / city

Eknath Shinde Political Rebellion : आरोप झालेले आमदार संजय राठोड एकनाथ शिंदेंचे दूत?

एकनाथ शिंदेच्या ( Eknath Shinde ) वतीने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तीन आमदारांनापैकी संजय राठोड यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आमदार संजय राठोड ( MLA Sanjay Rathod ) यांची पुण्यातील एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र शिंदेंच्या वतीने राठोड बैठकीला उपस्थित असल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

Eknath Shinde Political Rebellion
Eknath Shinde Political Rebellion
author img

By

Published : Jun 21, 2022, 4:20 PM IST

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. तेव्हापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या तीन प्रमुख आमदारांनी मध्यस्थीची भूमिका निभावत वर्षावरील बैठकीत उपस्थित होते. यात चर्चेसाठी शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक उपस्थित होते. तर एकनाथ शिंदेच्या वतीने दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर हे आमदार बैठकीला उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदेच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तीन आमदारांनापैकी संजय राठोड यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आमदार संजय राठोड ( MLA Sanjay Rathod ) यांची पुण्यातील एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र शिंदेंच्या वतीने राठोड बैठकीला उपस्थित असल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

कोण आहेत संजय राठोड? : संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली. त्यानंतर आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आणि दिग्रस विधानसभा संघातून निवडून येत आमदार झाले. मात्र पुण्यातील एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांना आपल्याकडे असलेल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काही दिवस शांत होते. पुन्हा बंड केलेल्या आमदारांमध्ये विशेष म्हणजे एकनाथ शिंदेच्या प्रमुख नेत्यांमध्ये ते चर्चेसाठी उपस्थित होते. सोबतच त्यांची ही धडपड पुन्हा मंत्री मिळवण्यात सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संजय राठोड यांना काय फायदा? : एकनाथ शिंदेंनी केलेल्या या बंडात मध्यस्थी भूमिका बजावणाऱ्या आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्री पदाची आस लागल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही बोलल्या जात आहे. यावेळी एकनाथ शिंदेंचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर आमदार राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वर्षा वैठकीत 'या' आमदारांची उपस्थिती : दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर, राजन विचारे, सुनील प्रभू, उदय सामंत, अजय चौधरी, अंबादास दानवे, दिलीप लांडे, दिपक केसरकर, सचिन अहिर या आमदारांची उपस्थिती होती.

हेही वाचा - Eknath Shinde : नाराज मंत्री एकनाथ शिंदे सुरतमध्ये.. गुजरात भाजप अध्यक्षांच्या संपर्कात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.