ETV Bharat / city

NCP in Satara is Unstable : महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे सातार्‍यातील राष्ट्रवादीत अस्वस्थता

शिवसेनेतील आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर ( Lead Government Unstable )बनले आहे. बंडखोर शिवसेना आमदार आणि भाजप एकत्रित येऊन सरकार स्थापन ( BJP government formed ) करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास सहकार खात्याचे कॅनिबेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद आपल्या हातातून जाईल. या संभाव्य शक्यतेमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वर्तुळात अस्वस्थता दिसत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे मंत्री बाळासाहेब पाटील ( Minister Balasaheb Patil ) यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

Shambhuraj Desai and Minister Balasaheb Patil
शंभूराज देसाई व मंत्री बाळासाहेब पाटील
author img

By

Published : Jun 23, 2022, 1:41 PM IST

सातारा : शिवसेनेतील आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर (Lead government Unstable ) बनले आहे. बंडखोर शिवसेना आमदार ( Rebel Shiv Sena MLA ) आणि भाजप एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास सहकार खात्याचे कॅनिबेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद आपल्या हातातून जाईल. या संभाव्य शक्यतेमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वर्तुळात अस्वस्थता दिसत आहे.

Lead government unstable
आघाडी सरकार अस्थिर

शशिकांत शिंदेंच्या पराभवामुळे बाळासाहेब पाटलांना चाल : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला होता. स्थानिक स्वराज्य सस्थांवरही राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. मात्र, 2019 ला सातार्‍याचे आमदार शिवेेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंचा पराभव झाला. पुढे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत असते आणि शशिकांत शिंदे विजयी झाले असते, तर सातारा जिल्ह्यातील मंत्रीपदाचे ते दावेदार ठरले असते.

बाळासाहेबांना मंत्रिपद : शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्याने आणि शिंदे पराभूत झाल्याने कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना चाल मिळाली. मंत्रीमंडळात त्यांना उशिरा संधी मिळाली. परंतु, सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाचा बोनसही मिळाला.

सातार्‍याला तिसर्‍यांदा मिळाले सहकार खात्याचे मंत्रिपद : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सातारा जिल्ह्याला आणि त्यातही कराड तालुक्याला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने तिसर्‍यांदा सहकार खात्याचे मंत्रिपद मिळाले. या अगोदर दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासकाका उंडाळकर (काँग्रेस) या नेत्यांनी सहकार मंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या मंत्रीपदाची अडीच वर्षे पूर्ण झाली असतानाच शिवसेनेत राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेले सहकार मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद जाणार, या शक्यतेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

तर दोन्ही पदे शंभूराज यांच्याकडे : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील. हे नवे सरकार सत्तेवर आल्यास सहकार मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद शिवसेनेचे पाटणमधील बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे येऊ शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

शंभूराज देसाई फडणवीसांचे मर्जीतले : शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत. फडणवीस आणि देसाई यांच्या मैत्रीचे किस्से सर्वश्रुत आहेत. त्यामुळे राजकीय निरीक्षकांचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Devendra Fadnavis : फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.