ETV Bharat / city

'महा'राज्याच्या सत्तेचा 'महा'पेच! उद्धवजींना फोन करूनही त्यांनी घेतला नाही, मुख्यमंत्र्यांचा खुलासा - महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंग

राज्यात राजकीय घडामोडींना वेग... सर्व प्रमुख पक्षांकडून बैठका सुरू... उद्धव ठाकरे CM पदावर ठाम.. काँग्रेसचे आमदार जयपूरला रवाना.. शिवसेना आमदारांना रंगशारदामधून हॉटेल द रिट्रीटमध्ये नेणार..

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष
author img

By

Published : Nov 8, 2019, 9:16 AM IST

Updated : Nov 8, 2019, 7:34 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभेच्या निकालानंतर सुरू झालेले सत्ता संघर्षाचे वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाही. शनिवारी राज्यात सध्या असलेल्या १४ व्या विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येत असून, अद्यापही नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ही भाजप शिवसेनेला सरकार स्थापन करता आले नाही. मुख्यमंत्री पदाच्या वादात गेली १४ दिवस सरकार स्थापन होऊ शकले नाही. शनिवारी सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाल संपणार आहे, त्या आधी नवे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. पण सध्या राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार हालचाली होताना दिसत आहेत...

४.४९ PM - मुख्यमंत्री फडणवीसांचा राजीनामा, उद्धवजींना फोन करून त्यांनी घेतले नाही, मुख्यमंत्र्यांचा खुलासा

4.24 PM - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

political crisis in maharashtra to form new government
मुख्यमंत्री फडणवीसांचा राजीनामा

4.20 PM - शिवसेना नेते संजय राऊत सिल्वर ओक बंगल्यावर शरद पवारांच्या भेटीला

४.११ PM - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटायला गेले आहेत. त्याठिकाणी सत्तास्थापनेचा दाव करणार आहेत, की राजीनामा देणार आहेत, हे थोड्यावेळात स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री फडणवीस राजभवनाकडे रवाना

3:10 PM - 'वर्षा'वर भाजप नेत्यांची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला, चंद्रकांत पाटील, सुधीर मुगंटीवार आदी नेते उपस्थीतीत..

3:00 PM - उद्धव ठाकरे सायंकाळी रंगशारदा येथे जाणार

हॉटेल रंग शारदा येथे शिवसेना आमदारांना भेटायला जाणार आहेत. सायंकाळी 4 पर्यंत रंग शारदाला पोहचण्याची शक्यता...

2:44 PM - राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी सलग दुसऱ्या दिवशी राजभवनात दाखल

कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राज्यपालांनी केले पाचारण

2:41 PM - महसुलमंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वर्षा निवासस्थानी दाखल

2:41 PM - रामदास आठवले शरद पवार यांच्या बंगल्यावर पोहचले
2:38 PM - शिवसेना नेते एकनाथ शिंदे पुन्हा रंगशारदावर दाखल

2:50 PM - शिवसेना भवनावरील बैठक संपन्न

शिवसेना भवनावरील बैठक संपन्न. उद्धव ठाकरे रंग शारदा येथे आमदारांना भेटायला येणार.

  • 2 :45 PM - शिवसेनेच्या सर्व आमदारांना द रिट्रीटमध्ये हलवणार
  • 2:14 PM - रामदास आठवले घेणार शरद पवारांची भेट
  • 2:13 PM - आघाडीचे नेते स्वत:च्या आमदारांवर अविश्वास व्यक्त करत आहे - सुधीर मुनगंटीवार
  • 2:11 PM - फडणवीस योग्यवेळी तांत्रिक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. शिवसेना सोबत एकाच प्रस्वावावर चर्चा सुरु आहे. योग्यवेळी तिढा सुटेल - मुनगंटीवार
  • 2:09 PM - भाजपा आमदारांची खरेदी करत नाही. विरोधकांनी नवनिर्वाचीत स्वपक्षीय आमदारांची माफी मागावी, जनतेची माफी मागावी - मुनगंटीवार

1:55 pm - उद्धव ठाकरे CM पदावर ठाम

शिवसेना भवनावरील बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रंगशारदा येथे जाणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना CM पदावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

1:45 PM : शिवसेना आमदारांना रंगशारदा मधून दुसरीकडे हलवणार

रंगशारदा हॉटेल बाहेर घडामोडीना वेग. रंगशारदा हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. यासाठी दोन बसेस मागवण्यात आल्या आहेत. मात्र या आमदारांना कुठे घेऊन जाणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

1:15 PM - काँग्रेसचे आमदार जयपूरला रवाना

राज्यातील काँग्रेसचे काही आमदार हे जयपूरला रवाना झाले आहे. काँग्रेसच्या आमदारांना आमच्या सोबत चला म्हणून तगादा लावला जातोय, त्यामुळे वैतागून काँग्रेसचे काही आमदार जयपूरला गेले असतील. अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

1:00 PM - नितीन गडकरी मध्यस्थीसाठी प्रयत्न करणार

भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेला सत्ता संघर्षात नितीन गडकरी हे मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

12:55 PM - उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेना भवनावर दाखल झाले आहेत.

12:50 PM - शरद पवार सिल्वर ओकवर दाखल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर दाखल झाले आहेत. येथे त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आणि आमदारांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे.

12:40 PM : काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू होत आहे. राज्यातील सत्ता संघर्षात काँग्रेसची भूमिका या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

12:35 PM : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनाकडे रवाना

शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची शिवसेना भवनावर बैठक होत आहे. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे रवाना झाले आहे.

12:25 PM : संभाजी भिडे वर्षा बंगल्यावर

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले आहे.

12:20 PM - शरद पवार मुंबईत होणार दाखल

थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या 'सिल्वर ओक' या बंगल्यावर पोहोचणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि इतर काही आमदार उपस्थित राहणार आहेत.

11:44 AM - वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

राज्यात सेना भाजप यांच्या बैठका होत असताना आता काँग्रेसही यात पुढे सरसावली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सध्या सुरू होत आहे.

11:40 AM : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल

भाजप नेते नितीन गडकरी मुंबईत दाखल झाले असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्यावर जाणार आहेत.

11:20 AM : शिवसेना खासदारांची मुंबईत बैठक

राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना आपल्या ताकदीची पुन्हा चाचपणी करताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेने याच पार्श्वभूमीवर राज्यातील आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांना मुंबईत बोलावले आहे.

11:11 AM : शिवसेना जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक

शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची शिवसेना भवन मुंबई येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्हा प्रमुखांसोबत पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत बातचीत करण्याची शक्यता आहे.

  • भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत आज बैठक होणार, बैठकीत ठोस निर्णयाची शक्यता

10:00 AM : भाजप नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईकडे रवाना

9:50 AM - संजय राऊत यांची पत्रकार परिषद

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;

  • शिवसेना आणि भाजपचा निर्णयात तिसऱ्याने मधे पडण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंनीच मध्यस्तीची गरज नसल्याचे सांगितले आहे.
  • राष्ट्रपती शासन लावून सत्ता करायची असेल तर तो शिवाजी महाराजांचा आणि राज्यातील जनतेचा अपमान असेल.
  • पैसा आणि सत्तेच्या जोरावर कर्नाटक प्रमाणे घोडाबाजाराचा प्रयत्न होत आहे.परंतु कर्नाटक पॅटर्न इथे चालणार नाही.
  • काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहण्याचा सध्याच्या सरकारचा पर्यायाने भाजपचा डाव

हेही वाचा... नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता

राज्यातील सत्ता पेचाबाबतच्या घटनात्मक तरतुदी अथवा संसदीय परंपरेच्या संकेतांनुसार पुढील उपाय योजावे लागतील. किंवा राज्यपाल राज्यातील राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पुढील उपाय योजू शकतात...

  • सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात येणार आहे. तो पर्यंत सध्या असलेले मुख्यमंत्र्यांना राजीनामा सादर करावा लागेल
  • पुढील व्यवस्था होईपर्यंत विद्यमान मुख्यमंत्र्यांना राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पहाण्याचा आदेश देऊ शकतात. मात्र, या काळात मुख्यमंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.
  • हंगामी विधानसभा अध्यक्षांना राज्यपाल शपथ देतील. तसेच, नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरच सध्या निवडून आलेल्या सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली जाईल.
  • नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया राज्यपालांकडून केली जाईल. जर कोणत्याही पक्षाने स्वतः सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर, सर्वात मोठ्या पक्षाला राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी पाचारण करतील.
  • राज्यातील सगळ्यात मोठ्या पक्षाला म्हणजे भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यास त्यानंतरच्या पक्षाला पाचारण केले जावू शकते.
  • एखाद्या पक्षाला बहुमत दाखवण्यासाठी ठराविक कालावधी राज्यपालांकडून दिला जाईल. जर सर्व पर्यायांतून कोणत्याच पक्षाने सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली नाही तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्राला करू शकतात.
  • राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती तसा आदेश काढून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात.

हेही वाचा... सत्तेचा 'पेच' कायम, शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याच्या कारभारात होणारे बदल

  • राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत राज्यपाल आणि त्यांनी नेमलेल्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार कामकाज पाहिले जाते.
  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास नव्याने अस्तित्वात आलेली विधानसभा निलंबित ठेवावी लागते.
  • राष्ट्रपती राजवटीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला १४५ चा जादुई आकडा गाठणे शक्य झाल्यास सरकार स्थापण्याचा दावा करता येतो, तसेच नव्याने निवडलेली निलंबित विधानसभा पुन्हा कार्यरत होते.

Intro:Body:

सत्तेचा पेच !  आता काय होणार ? आजचा दिवस महत्वाचा 

मुंबई- महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ही भाजप शिवसेनेला सरकार स्थापन करता आले नाही. मुख्यमंत्री कोणाचा या वादात गेली १४ दिवस राज्याची जनता नव्या मुख्यमंत्र्याची वाट पहात आहे. १४ व्या विधानसभेची मुदत शनिवारी  संपणार आहे. त्या आधी नवे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. मात्र सध्याची राजकीय स्थिती पहाता नवे सरकार स्थापन होण्याची आशा धुसर आहे.  त्यामुळे राज्यात नवा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत काय काय होवू शकते यावर टाकलेला हा एक दृष्टी क्षेप.....  

- मावळत्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात येणार आहे. तो पर्यंत मुख्यमंत्र्यांना राजीनामा सादर करावा लागेल 

- पुढील व्यवस्था होई पर्यंत विद्यमान मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणूनकारभार पहाण्याचा आदेश राज्यपाल देऊ शकतात 

- या काळात धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांना घेता येणार नाहीत. 

- हंगामी विधानसभा अध्यक्षांना राज्यपाल शपथ देतील

- नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली  जाईल 

- सरकार स्थापनेची प्रक्रिया राज्यपालांकडून केली जाईल 

- कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर सर्वात मोठ्या पक्षाला राज्यपाल पाचारण करणार 

- त्याने असमर्थता दर्शवल्यास त्यानंतरच्या पक्षाला पाचारण केले जावू शकते 

- बहुमतासाठी सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला ठरावीक कालावधी राज्यपालांकडून दिला जाईल 

- कोणत्याच पक्षाने सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली नाही तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्राला करू शकतात

- केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सल्ल्या नुसार राष्ट्रपती तसा आदेश लागू करतात 

- या कालावधीत राज्यपाल आणि त्यांनी नेमलेल्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार  कामकाज पाहीले जाते 

- राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास नव्याने अस्तित्वात आलेली विधानसभा निलंबित ठेवावी लागते 

- राष्ट्रपती राजवटीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला १४५ चा जादुई आकडा गाठणे शक्य झाल्यास सरकार स्थापण्याचा दावा करता येतो 

- तसेच निलंबित विधानसभा पुन्हा कार्यरत होते. 

Conclusion:
Last Updated : Nov 8, 2019, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.