ETV Bharat / city

Sambhaji Raje : संधी, साळसूदपणाचा आव आणि धोका.. भाजपनेच केला संभाजी राजेंचा 'राजकीय गेम'? - संभाजी राजे राज्य सभा निवडणूक माघार भाजप भूमिका

राष्ट्रपती नियुक्त सदस्य ( Sambhaji Raje and Rajya Sabha election ) म्हणून संधी दिलेल्या संभाजीराजांना ( Sambhaji Raje Rajya Sabha election news ) भाजपने खड्यासारखे बाजूला केले. शिवाय, साळसूदपणाचा आव आणत महाविकास आघाडी सोबत जाणार नाहीत, याची तजवीज केली. त्यामुळे, इतरांकडे बोट दाखवणाऱ्या भाजपनेच ( Sambhaji Raje Rajya Sabha election withdraw analysis ) संभाजीराजांचा राजकीय गेम केला, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Sambhaji Raje withdrew from Rajya Sabha elections
संभाजी राजे
author img

By

Published : May 29, 2022, 8:14 AM IST

Updated : May 29, 2022, 10:18 AM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजी राजे छत्रपतींनी शिवसेनेवर निशाणा साधला. मात्र, राष्ट्रपती नियुक्त सदस्य ( Sambhaji Raje and Rajya Sabha election ) म्हणून संधी दिलेल्या संभाजीराजांना ( Sambhaji Raje Rajya Sabha election news ) भाजपने खड्यासारखे बाजूला केले. शिवाय, साळसूदपणाचा आव आणत महाविकास आघाडी सोबत जाणार नाहीत, याची तजवीज केली. त्यामुळे, इतरांकडे बोट दाखवणाऱ्या भाजपनेच ( Sambhaji Raje Rajya Sabha election withdraw analysis ) संभाजीराजांचा राजकीय गेम केला, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

माहिती देताना राजकीय विश्लेषक संदीप प्रधान

हेही वाचा - Today Gold Silver Rates : आजचे सोने- चांदीचे दर काय आहेत?...जाणून घ्या एका क्लिकवर...

राज्यसभेवर जाणाऱ्या महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त झाल्या आहेत. येत्या १० जूनला या जागांसाठी निवडणूक होणार आहेत. निवडणुकीत भाजप दोन, काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी एक आणि शिवसेना दोन जागांवर लढणार आहे. निवडणुकीतून राज्यसभेवर जाण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी अपक्ष लढण्याचे स्पष्ट केले. विजयासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. पुरेसे मताधिक्य नसल्याने शिवसेना पुरस्कृत उमेदवार लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. संभाजी राजेंच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा द्यावा, यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली.

शिवसेनेने सावध भूमिका घेत, संभाजी राजेंना पक्षात येण्याची विनंती केली. परंतु, भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून केंद्रात गेलेल्या संभाजी राजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली. शिवसेनेने त्यामुळे कोल्हापूरचे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली. निवडून येण्यासाठी मतांचे गणित न जुळल्याने संभाजी राजेंनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खंत व्यक्त केली. मात्र, संभाजी राजेंना खासदारकी मिळू नये, यासाठी अप्रत्यक्षपणे भाजपने हालचाली केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपच जबाबदार - संभाजी राजे यांना गेल्या वेळी राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून संधी दिली होती. त्यामुळे, इच्छुक असताना पुन्हा त्यांच्या नावाचा पुनर्विचार होणे अपेक्षित होते. परंतु, साळसूदपणाचा आव आणत भाजपने महाविकास आघाडीकडे त्यांना ढकलून दिल्याचा आरोप जनता दलाचे मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केला.

महाविकास आघाडीने त्यांना नकार न देता, पक्षात सामावून घेण्याची भूमिका घेतली. शिवसेनेकडे दुसरी जागा असल्याने त्यांच्या काही अटी शर्ती होत्या. छत्रपतींचे वारस असलेल्या संभाजी राजेंचा मान ठेवून त्यांना पक्षात येण्याची विनंती शिवसेनेने केली. संभाजी राजेंना ते मान्य नव्हते. मुळात राजकारणात आल्यानंतर सगळं काही आयते मिळत नाही. काही गोष्टींशी तडजोड करायला हवी होती. मात्र नकार दिल्याने आज संभाजी राजेंची कोंडी झाली आहे, त्याला ते स्वतः आणि दुसरे म्हणजे भाजप जबाबदार आहेत, असे जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सांगितले.

भाजपच्या जाळ्यात संभाजीराजे फसले - संभाजी राजेंची खरी कोंडी कोणी केली असेल तर भाजपने. गेल्यावेळी राज्यसभेत भाजपचे खासदार म्हणून गेले होते. त्यामुळे भाजपने त्यांना पुन्हा संधी द्यायला हवी होती. तसे न करता भाजपने त्यांना दूर लोटले. शिवाय महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेसोबत जाणार नाहीत, याची नियोजन केले. भाजपच्या जाळ्यात संभाजी राजे फसले, त्यामुळेच शिवसेनेकडून राज्यसभेत जाण्याची त्यांची संधी हुकली, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी दिली. तसेच, राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या गड किल्ले संवर्धन आणि जतनमध्ये त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतले जाईल, असे ते म्हणाले.

म्हणूनच झाला घात - संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकांमध्ये सातत्य नसल्यामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले आहे, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. संभाजी राजेंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मागच्या वेळी ते भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून गेले. या वेळेला शिवसेनेने त्यांना शिवसेनेचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी मात्र आपल्याला कुठल्याही पक्षात सोबत जायचे नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यामुळेच त्यांची फसगत झाली, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले.

संभाजी राजेंनी अपक्ष निवडणूक लढवावी, यासाठी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे, चुकीचा सल्ला घेऊन संभाजी राजे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र, मताधिक्य असलेल्या पक्षाची विनंती नाकारून विरोधी पक्षीय नेत्यांच्या कलाने जाण्यामुळे त्यांचा घात झाला आहे. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आहे. त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घेतला असता तर त्यांची फसगत झाली नसती, असेही प्रधान यांनी सांगितले.

लोकसभा लढवून लोकप्रियता मिळवावी - संभाजी राजे यांनी सर्वसमावेशक राजकीय आणि सामाजिक भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र राजे एका विशिष्ट राजकीय पक्ष आणि समाजासाठी काम करतात, असा संदेश नागरिकांमध्ये गेला. त्यात शिवसेनेची ऑफर त्यांनी झुडकारली, त्यामुळे विशिष्ट पक्षासाठी काम करतात, या संदेशाला बळकटी मिळाली. राजेंनी आता लोकसभा लढवून लोकप्रियता मिळवावी, असे मुक्त वरिष्ठ पत्रकार प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा - Vegetables Grains Rate Today : भाजीपाला, धान्याच्या दरांमध्ये आज वाढ की घसरण..? पाहा आजचे दर

Last Updated : May 29, 2022, 10:18 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.