ETV Bharat / city

Vedanta Foxconn - वेदांत फॉक्सकॉनवरुन महाराष्ट्रात राजकीय धुळवड

author img

By

Published : Sep 14, 2022, 5:34 PM IST

Updated : Sep 14, 2022, 7:47 PM IST

वेदांत फॉक्सकॉनवरुन महाराष्ट्रात राजकीय धुळवड सुरू झाली आहे (Vedanta Foxconn). आदित्य ठाकरे यांनी यावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर पलटवार केला. तर राज ठाकरेंनीही राज्य सरकारला यावर जाब विचारला. वेदांत प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांना फोन लावला. मात्र यापेक्षाही मोठा प्रकल्प राज्याला देऊ असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याने आता प्रकरणावर पडदा पडला असे म्हणावे लागेल.

वेदांत फॉक्सकॉनवरुन महाराष्ट्रात राजकीय धुळवड

मुंबई - गुजरातला मेगा वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गेल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला असाच किंवा आणखी चांगला प्रकल्प मिळेल, असे आश्वासन दिले आहे. ठाण्यात पत्रकारांशी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. गुजरातने हा प्रकल्प मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधानांशी चर्चा केली होती.

काय होता प्रकल्प - भारतात सुरू असलेल्या ऑटोमोबाईल आणि स्मार्टफोन उद्योगांमध्ये अत्याधुनिक अशा सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. मात्र, सध्या भारतात या सेमी कंडक्टरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर तयार व्हावेत. यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळ उभारण्यात येणार होता (Vedanta Foxconn). यासंदर्भात तत्कालीन महाराष्ट्र सरकारने अनेक बैठका घेतल्या होत्या. तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात सेमी कंडक्टर प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे.

आदित्य ठाकरे यांचा आरोप - शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते की, पूर्वीच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारने हा प्रकल्प जवळजवळ अंतिम केला होता. सध्याच्या व्यवहारामुळे संभाव्य गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला आहे, असा आरोप त्यांनी केला होता. भारतीय समूह वेदांत आणि तैवानी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमाने राज्यात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी मंगळवारी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. वेदांत-फॉक्सकॉन 1,54,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

प्रसाद लाड यांचा प्रतिटोला - दुसरीकडे ठाकरे परिवाराने आधी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची उत्तरे द्यावीत, असा पलटवार भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने मुंबई महानगरपालिकेतील गेल्या दोन वर्षातील भ्रष्टाचाराची उत्तरे द्यावीत. बारा हजार कोटी रुपयांचा भुर्दंड शासनाला कशासाठी बसला, त्याचे उत्तर द्यावे असा प्रतिटोला लाड यांनी लगावला आहे. वेदांत प्रकल्पाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी एका ट्विटद्वारे हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचे संकेत दिले होते.

राज ठाकरेंनी विचारला राज्यसरकारला जाब - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वेदांत प्रकरणात सरकारला जाब विचारला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेलाच कसा, असा प्रश्न त्यांनी आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा प्रश्न राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.

शिंदे फडणवीस यांचीही वेदांतबरोबर बैठक - तैवानमधील फॉक्सकॉन आणि भारतामधील वेदांता समूहाबरोबर सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासंदर्भात शिंदे फडणवीस यांचीही एक बैठक सत्ता आल्यानंतर झाली होती. या बैठकीसंदर्भात एमआयडीसीने (midc) आपल्या ट्विटर हँडल वरून 26 जुलै 2022 रोजी बैठक पार पडल्याची आणि महाराष्ट्रात आता लवकरच लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्री शिंदेंचा थेट पंतप्रधानांना फोन - वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडबडून जाग आली. मुख्यमंत्र्यानी यानंतर काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत उद्योगधंदे प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली.

वेदांत प्रकल्पाचा असा झाला प्रवास - वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा तळेगांव येथे येणारा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला आहे. वेदांता व तेवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली. जागा निवडीसाठी एकूण १०० मुद्दांचा विचार केला. त्यांनी तळेगाव टप्पा ४ ही जागा अंतिम केली. तळेगाव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते , रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, जेएनपीटीशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगाव येथील १ हजार एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरीष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले होते. मात्र आता हा पोकळ इतिहास झाला आहे. हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे.

Last Updated : Sep 14, 2022, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.