अभिनेता रणवीर सिंगने काही दिवासांपूर्वी न्यूड फोटो टाकल्याने खळबळ उडाली होती. त्यावरुन त्याच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली होती. तर, काही जणांनी त्याचे समर्थन केले होते. त्यातच आता रणवीर चेंबुर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे. चेंबूर पोलिसांनी दोन तासाहून अधिक काळ रणवीरचा जबाब नोंदवला आहे.
चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंगला दोनदा समन्स पाठवले. मात्र तो उपस्थित नसल्याने, जबाब नोंदवण्यास उशीर झाला. आज सकाळी रणवीर आपल्या लीगल टीम सोबत, चेंबूर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि दोन तास पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला आहे.
दरम्यान पोलिसांनी रणवीरला अनेक प्रश्न विचारले, न्यूड फोटोग्राफी शूटचा कोणत्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता. कधी केला होता आणि कुठे शूट केले होते, अशा प्रकारे फोटोशूट करून लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, याची आपणास कल्पना होती का, असे अनेक सवाल पोलिसांनी विचारले. पुढील तपासासाठी देखील रणवीर आणि त्यांची लिगल टीम पोलिसांना सहकार्य करेल, अशी माहिती देण्यात आली.
अभिनेता रणवीर सिंगवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंगवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रणवीर सिंगविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रणवीर सिंगविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे न्यूड फोटोशूट करणे रणवीरच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसते आहे.
हेही वाचा Supreme Court Hearing सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष कायम, सुनावणी लांबणीवर