मुंबई - मुंबईच्या मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने कंगना रणौत यांच्याविरोधात दाखल केलेल्या प्रकरणात पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत यांच्यावर बदनामी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत यांच्यावर बदनामी केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी शनिवारी अख्तर यांच्या वकिलांनी आपला खटला न्यायालयात सादर केला, आणि या खटल्याची दखल घेण्याची विनंती न्यायालयाला केली. सुनावणीनंतर न्यायालयाने जुहू पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले असून, 16 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करावा असे म्हटले आहे.