मुंबई - शहराची सुरक्षा पाहणाऱ्या पोलीस विभागात एक चिंताजनक बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते वास्तव्यास असलेली योगी नगर पोलीस इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. तसेच इमारतीतील अन्य नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एक पथक पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर 25 जीआरपी पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या व मुंबई पोलीस खात्यात प्रोटेक्शन विभागात कार्यरत असलेल्या एक पोलीस शिपायाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला कुटुंबासह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर कुरार पोलीस ठाण्यातून ही तिसरी घटना समोर आलीय.
#Corona: मुंबई पोलीस खात्यातील आणखी एकाला कोरोनाची लागण - corona in mumbai
मुंबई पोलिसांच्या कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते वास्तव्यास असलेली योगी नगर पोलीस इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे.
![#Corona: मुंबई पोलीस खात्यातील आणखी एकाला कोरोनाची लागण mumbai police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6685274-383-6685274-1586170227889.jpg?imwidth=3840)