मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते वेदांत ग्रुप व फोक्सकॉन यांच्या समभागीदारीचा प्रकल्प ( Vedanta Group and Foxconn project) राज्याबाहेर गेल्याने मंत्रालयासमोर आंदोलन करणार ( NCP leaders protest in front of ministry ) होते. परंतु पोलीसांनी आंदोलन करण्याआधीच त्यांची धरपकड (police caught NCP leaders before protest) केली.
काय होता प्रकल्प ? भारतात सुरू असलेल्या ऑटोमोबाईल आणि स्मार्टफोन उद्योगांमध्ये अत्याधुनिक अशा सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. मात्र, सध्या भारतात या सेमी कंडक्टरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर तयार व्हावेत. यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळ उभारण्यात येणार होता. यासंदर्भात तत्कालीन महाराष्ट्र सरकारने अनेक बैठका घेतल्या होत्या. तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात सेमी कंडक्टर प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत झाल्यात जमा आहे.
अग्रवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून केला खुलासा : राज्यातील वादावर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून खुलासा केला. दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु असतानाच करार निश्चित केला, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. पुढे अग्रवाल यांनी म्हटले आहे की, नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून चर्चा करून प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत गुजरात सरकारने त्यांना दिलेली ऑफर आणि सवलत त्यांनी मान्य केली. परंतु, भविष्यात महाराष्ट्रातही ते इंटिग्रेटेड प्रकल्प आणण्याचे काम काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय आरोप सुरू - ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच ‘वेदान्त’ कंपनीच्या मालकांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. चार वेगवेगळ्या पोस्ट करताना त्यांनी गुजरातची निवड केल्याचे सांगतानाच लवकरच या प्रकल्पाअंतर्गत भारतभर उद्योगांचं जाळे पसरवण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने योग्य वाटाघाटी न केल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप विरोधकांनी फेटाळला. महाराष्ट्राने गुजरातपेक्षा १२ हजार कोटी रुपयांच्या अधिक सवलती देऊनही प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
महाविकासआघाडी सरकारच्या काळात अनेक प्रोजेक्ट राज्यात येणार होते. वेदांता (vedanta project) कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर 100 गोष्टींचा, अटींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केलं होतं. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव दाभाडे हीच योग्य जागा सांगितली होती. मात्र, ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये (Investment in Gujarat due to political pressure) गेली असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी केलाय. अशी गुंतवणूक राज्यातून जाणं योग्य नाही. 2 लाख लोकांचा रोजगार गेला. 2 लाख कोटींची गुंतवणूक गेली. हे योग्य नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.
काय म्हणाले अजित पवार? आपण उद्योगाबाबत कुणाच्याही दबावाला बळी पडू नये. ही आपली परंपरा नाही. पंतप्रधान आश्वासन देत आहेत ठीक आहे. तो ही प्रकल्प यावा. कारण बेरोजगारी खूप आहे. आपल्याकडे प्रोजेक्ट्सची गरज आहे. अजूनही वेळ गेली नाही. कॅबिनेटमध्ये काय हवं तो निर्णय घ्यावा. आणि प्रोजेक्ट राज्यात आणावा. ही गुंतवणूक जाऊ नये. हा आर्थिक दृष्ट्या मागास करण्याचा प्रयत्न आहे. आमचं सरकार कमी पडले नाही आमच्यावरील आरोप खोटे आहेत.