ETV Bharat / city

वामन जोशी खून प्रकरण : कन्नड भाषेवरून पोलिसांनी आवळल्या मारेकऱ्याच्या मुसक्या - बोरिवली

महेश चंद्र गौडा, अनिलकुमार गौडा आणि किरणकुमार गौडा यांनी हॉटेल व्यावसायिकाचा खून केला होता. या तिघांनाही बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी
author img

By

Published : Apr 27, 2019, 11:51 PM IST

मुंबई - बोरिवलीत वामन जोशी या हॉटेल व्यावसायिकाच्या घरी चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या नोकराला त्याच्या 2 साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. महेश चंद्र गौडा, अनिलकुमार गौडा आणि किरणकुमार गौडा, असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. कुठलाही पुरावा नसताना, केवळ खून करणारे आरोपी आपापसात कन्नड भाषेत बोलत असल्याचे पोलिसांना समजताच आरोपींचा 3 राज्यात माग घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मारेकऱ्यांना अटक केली आहे.

आरोपींसह पोलीस

मुख्य आरोपी महेश गौडाला त्याच्या गावी फ्रँकी फास्ट फुडचे हॉटेल सुरू करायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. गेल्या सहा महिन्यांपासून महेश गौडा हा मृत वामन जोशी यांच्या बोरिवली स्टेशनजवळ असलेल्या सद्गगुरू हॉटेलमध्ये कामाला होता. यादरम्यान वामन जोशी हे त्यांच्या घरात लाखो रुपयांची रोकड ठेवत असल्याची माहिती मिळली. त्यामुळे आरोपी महेश गौडाने त्याचे दोन मित्र अनिलकुमार गौडा, किरणकुमार गौडा या दोघांना पैशांचे आमिष दाखवत लुटीचा कट रचला.

बोरिवली परिसरात राहणारे वामन जोशी (70) हे आपल्या घरात एकटेच राहत होते. 18 एप्रिलला या तिन्ही आरोपींनी वामन जोशी यांच्या घरात शिरून त्यांची गळा दाबून हत्या केली. मात्र यादरम्यान या आरोपींना घरातून केवळ 10 हजार रुपये मिळाले होते. खून झाल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारू प्यालेले हे तीनजण कन्नड भाषेत संभाषण करत होते. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास पुढे नेला. पोलिसांनी वामन जोशी यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. या दरम्यान काही दिवसांपूर्वी काम सोडून गेलेला महेश याचा फोन नंबर बंद होता. पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. महेशला शोधण्यासाठी पोलीस कर्नाटकतील त्याच्या घरी पोहोचले. मात्र तो घाबरून तेथून पळाला आणि आपल्या साथीदारांसह तामिळनाडूतील कोचीपल्ली या गावी पोहोचला. मात्र आरोपींच्या मागावर असलेल्या पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आरोपींना अटक केली.

Intro:बोरिवलीत वामन जोशी (70) या हॉटेल व्यावसायिकाचा त्यांच्या राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या नोकराला त्याच्या 2 साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. कुठलाही पुरावा नसताना केवळ खून करणारे आरोपी आपआपसात कन्नड भाषेत बोलत असल्याचे पोलिसांना समजताच आरोपींचा 3 राज्यात माग घेत अटक करण्यात आली आहे.Body:
या प्रकरणी महेश चंद्र गौडा, अनिलकुमार गौडा आणि किरणकुमार गौडा या तीन आरोपीना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी महेश गौडा यास त्याच्या गावी फ्रॅंकी फास्ट फुड चे हॉटेल सुरू करायचे होते.ज्यासाठी त्यास पैशांची गरज होती. गेल्या सहा महिन्यांपासून महेश गौडा हा मयत वामन जोशी यांच्या बोरिवली स्टेशन जवळ असलेल्या सद्गगुरू हॉटेल मध्ये कामाला होता. या दरम्यान वामन जोशी हे त्यांच्या घरात लाखो रुपयांची रोकड ठेवत असल्याची माहिती मिळताच आरोपी महेश गौडा ने त्याचे दोन मित्र अनिलकुमार गौडा , किरणकुमार गौडा या दोघांना पैशांचे आमिष दाखवत लुटीचा कट रचला.Conclusion:बोरिवली परिसरात राहणारे वामन जोशी (70) हे आपल्या घरात एकटेच राहत होते. 18 एप्रिल रोजी या तिन्ही आरोपीनी वामन जोशी यांच्या घरात शिरून त्यांची गळा दाबुन हत्या केली मात्र या दरम्यान या आरोपीना घरातून केवळ 10 हजार रुपये मिळाले होते. खुन झाल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारू प्यायलेले हे तीन जण कन्नड भाषेत संभाषण करत होते, हाच धागा पकडत पोलिसांनी तपास पुढे नेला. पोलिसांनी वामन जोशी यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. या दरम्यान काही दिवसांपूर्वी काम सोडुन गेलेला महेश याचा फोन नंबर बंद होता...पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. महेशला शोधण्यासाठी पोलीस कर्नाटकतल्या त्याच्या घरी पोहोचले मात्र तो घाबरून तेथून पळाला आणि आपल्या साथीदारांसह तामिळनाडूत
कोचीपल्ली या गावी पोहोचला मात्र आरोपींच्या मागावर असलेल्या पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीना अटक केली.

संग्रामसिंग निशानदार, डीसीपी, परिमंडळ 11
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.