ETV Bharat / city

महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधी लढाईचे पंतप्रधानांकडून कौतुक

सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाय योजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी मोदींनी राज्य सरकार कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक देखील केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 8, 2021, 3:22 PM IST

Updated : May 8, 2021, 7:21 PM IST

मुंबई - सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाय योजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी मोदींनी राज्य सरकार कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक देखील केले आहे.

राज्यातील ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याची मागणी

दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली. तसेच राज्यात ऑक्सिजनच्या आणखी पुरवठ्याची गरज असल्याचे देखील म्हटले आहे. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून, त्याचा राज्याला चांगला उपयोग होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने देखील मान्य केल्या आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

इतर लस मिळण्यासाठी पाठवले पत्र

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी इतर कंपन्यांची लस घेण्याची मागणी ठाकरे यांनी या पत्रात केली आहे. यासाठी आयसीएमआरच्या माध्यमातून राज्यातील एफडीएला योग्य मार्गदर्शक सूचना जारी करुन अशा प्रकारे इतर कंपन्यांच्या लसी घेण्याचा मार्ग मोकळा करता येऊ शकतो, असेही ठाकरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या मराठी शास्त्रज्ञाचा चेन्नईत ऑक्सिजन अभावीच मृत्यू

Last Updated : May 8, 2021, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.