ETV Bharat / city

कापूस खरेदीसाठी लगेच नियोजन करा, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश - cotton

भारतीय कपास निगम( CCI), महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासूनच कापूस खरेदीचे नियोजन करावे, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला दिले.

file photo
file photo
author img

By

Published : Sep 29, 2020, 10:52 PM IST

मुंबई - कृषी खात्याच्या अंदाजानुसार सन २०२०-२१ हंगामामध्ये ४२.०७ लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आलेले असुन ४५० लाख क्विंटल कापूस (९०० लाख गाठी) इतक्या मोठया प्रमाणात उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून भारतीय कपास निगम( CCI), महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांनी सुरुवातीपासूनच कापूस खरेदीचे नियोजन करावे, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला दिले. मंत्रालयात कापूस खरेदी हंगाम २०२०-२१च्या पूर्वतयारीबाबत सहकार व पणन मंत्री पाटील यांनी आढावा घेतला.

यावेळी पाटील यांनी सांगितले, की जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी यांच्याशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करून प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान १ ग्रेडर असावा. कापूस खरेदीपूर्वीच कृषी विभागामार्फत आवश्यक ते मुनष्यबळ ग्रेडर म्हणून उपलब्ध करून घेऊन त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावेत, खरेदी केलेला कापूस साठवणूकीचा व्यवस्था, सोयीसुविधा इतर नैसगिक आपत्तीपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने गोदाम, शेड, ताडपत्री आदी व्यवस्था करावी, बाजार समितीच्या स्तरावर शेतकरी निहाय नोंदवही, रेकॉर्ड ठेवले जावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावेत. कापूस खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कापूस खरेदीचे ठिकाण व वेळ एसएमएसद्वारे पाठविण्यात यावे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती समन्वय ठेवून भारतीय कपास निगम, कपास भवन व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक यांनी नियोजन करावे, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी केल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाच वेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही या दृष्टीने सर्व उपाययोजना करावी. तसेच गाडी पार्किंग, शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था करावी, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. बैठकीला कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक, कृषी पणन संचालक सतीश सोनी, सीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. अग्रवाल संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.