ETV Bharat / city

पाणी जपून वापरा..! मंगळवार, बुधवार सायन ते दादर पाणी पुरवठा बंद - मुंबईत पाणी पुरवठा खंडीत

रावळी येथील रावळी येथील उच्च स्तरीय जलाशय येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे मंगळवार ९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून बुधवार १० फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणी जपून वापरा..!
पाणी जपून वापरा..!
author img

By

Published : Feb 8, 2021, 4:18 AM IST

मुंबई - सायन रावळी येथील उच्च स्तरीय जलाशय येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मंगळवार ९ व बुधवार १० फेब्रुवारीला मुंबईत दादर, माटुंगा, चुनाभट्टी, किंग सर्कल, सायन, अँटॉप हिल या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दादर, नायगाव, शिवडी, लालबाग, परळ भागात कमी दाबाने पाणी येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

या कामासाठी पाणी बंद -

महापालिकेच्या ‘एफ/उत्तर’ विभागातील रावळी येथील रावळी येथील उच्च स्तरीय जलाशय येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे मंगळवार ९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून बुधवार १० फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर एफ दक्षिण भागात कमी दाबाने पाणी येईल. पाण्याची समस्या लक्षात घेता नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने केले आहे.

या भागात पाणी पुरवठा पूर्ण बंद -

दादर, माटुंगा, चुनाभट्टी, किंग सर्कल, सायन, अँटॉप हिल

या भागात कमी दाबाने पाणी -
दादर, नायगाव, शिवडी, लालबाग, परळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.