मुंबई: महाराष्ट्रात सध्या पाॅप्युलर फ्रंट वर छापेमारी सुरु आहे या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे की, सर्व काही नियमानुसार होत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. पुरावे गोळा केल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. मी म्हणेन की पीएफआयला देशात फूट पाडायची होती. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत सरकार सरस्वतीचे फोटो हटवणार नाही असे सांगत, त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर टीकाही केली आहे. मुंबईत मंत्रालयात ते बोलत होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) च्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाई नंतर त्यांच्यावरील कारवाई योग्य आहे की नाही? याबाबत वाद निर्माण झाला आहे. याविषयी बोलताना फडवणीस म्हणाले की, पीएफआय वर केलेली कारवाई ही पूर्णपणे योग्य आहे. याबाबत संपूर्ण आढावा घेतल्यानंतरचही कारवाई करण्यात आलेली आहे. दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे आणि देशाविरुद्ध युद्ध छेढणे असे काम या पीएफआय च्या कार्यकर्त्यांचं काम असल्याकारणाने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत.
शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत सरस्वती व शारदा मातेचे फोटो लावू नये नयेत, असे विधान काल राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झालेला असताना त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सरस्वती विद्येची देवता व कलेची देवता आहे. आपल्या संस्कृतीत त्यांना मोठे स्थान आहे. कितीही झाले तरी आम्ही सरस्वतीचा फोटो हटवणार नाही. परंतु भारतीय संस्कृतीची परंपरा व ज्यांना हिंदुत्व मान्य नसते तेच अशा पद्धतीचं विधान करतात. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याच्या चर्चा असताना यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरीश महाजन यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही आहे. अगोदर सुरू असलेला सीआयडी चा तपास हा सीबीआयकडे देण्यात आलेला आहे. मी दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये सर्व बाबींचा खुलासा असून आता याची चौकशी सीबीआय कडून केली जात आहे. परंतु गिरीश महाजन यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा नसल्याचही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितल आहे.