मुंबई- शिंदे सरकारने करात कपात केल्याने राज्यातील पेट्रोल व डिझेलचे दर कमी ( Petrol Diesel rates today ) झाले आहे. असे असले तरी महाराष्ट्रात डिझेलचा दर सरासरी 93.64 रुपये प्रति लिटर आहे. 11 ऑगस्ट 2022 पासून महाराष्ट्रात डिझेलच्या किमतीत कोणताही बदल ( Diesel rates in Maharashtra ) झालेला नाही. गेल्या महिन्यात 31 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रातील डिझेलच्या किमती 0.11 टक्क्यांनी वाढली होती. इधंनाचे दर हे रोज बदलतात. जाणून घ्या महाराष्ट्रातील ( Petrol rates in Maharashtra ) आजचे पेट्रोल व डिझेले दर
आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे आहेत.
शहर | पेट्रोलचा दर (प्रति लिटर रुपये) |
अहमदनगर | 106.32 |
अकोला | 106.14 |
औरंगाबाद | 108.00 |
बृहन्मुंबई | 1.6.48 |
मुंबई शहर | 106.31 |
नागपूर | 106.61 |
परभणी | 109.01 |
पुणे | 105.95 |
ठाणे | 105.82 |
इंधनाचा पुरवठा करणारे डेपो दूर असल्याने परभणीत इंधन महाग-
परभणी जिल्ह्यात मनमाड आणि सोलापूर आदी भागातून इंधनाचा पुरवठा होत असतो. या दोन्ही ठिकाणचे डेपो परभणीपासून जवळपास तीनशे ते चारशे किलोमीटर दूर आहेत. परभणीत येणाऱ्या इंधनासाठी वाहतूक खर्च सर्वाधिक आहे. हा खर्च सरकारी तेल कंपन्या पेट्रोल पंप चालकांकडून तर पेट्रोल पंप चालक हे ग्राहकांकडून वसूल करतात. त्यामुळे परिसरातील जिल्ह्यांसाठी या ठिकाणी इंधन डेपो उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे सरकार नेहमीच दुर्लक्ष करताना दिसत आहे.
हेही वाचा-Independence Day ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर
आजचे डिझेललचे दर खालीलप्रमाणे आहेत.
शहर | डिझेलचा दर (प्रति लिटर रुपये) |
अहमदनगर | 92.84 |
अकोला | 92.69 |
औरंगाबाद | 108.00 |
बृहन्मुंबई | 94.44 |
मुंबई शहर | 94.27 |
नागपूर | 93.14 |
परभणी | 95.42 |
पुणे | 92.47 |
ठाणे | 92.32 |