मुंबई- कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना आता महागाईचा सामना करावा लागत आहेत. देशात दिवसेंदिवस इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. मार्च-एप्रिलमध्ये इंधन दरामध्ये जास्त दरवाढ झाली नाही. परंतु, जून महिन्यातील इंधनदरवाढीमुळे नागरिकांना चिंतेत टाकले आहे. इंधनदरवाढीच्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत विक्रमी वाढ झाली आहे.
मुंबईत पेट्रोल 103.36 रुपये प्रतिलिटर तर, डिझेल 95.44 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 97.22 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर 87.97 रुपये झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 97.12 रुपये तर, डिझेलची किंमत 90.82 रुपये प्रतिलिटर झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 98.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. मुंबई दिल्लीसह इतर प्रमुख शहरात पेट्रोल आणि डिझेल विक्रमी दराने विकले जात आहेत. या प्रमुख शहरांतील इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
1 मे पासून किमतीत चढता क्रम..
1 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 27 वेळा वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.83 रुपयांची वाढ झाली. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7.24 रुपयांनी वाढ झाली आहे. देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. ज्यामुळे देशातील इंधानाच्या दरात दररोज सकाळी 6 वाजता सुधारणा होते.