मुंबई - राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात ( Petrol diesel rate Maharashtra ) करण्यात आली आहे. त्यामुळे, गगणाला भिडलेले इंधनाचे दर काहीसे कमी झाले आहेत. नागरिकांना यामुळे किंचित दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इंधनाचे दर शंभरी पार गेल्याने केंद्राने कर कपात केली होती. त्यानंतर मे 2022 मध्ये केंद्राने इंधनावरील दर कमी केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने दर कपात केली आहे. यामुळे थोड्या प्रमाणात महागाई देखील कमी होण्याची शक्यत आहे. दरम्यान, आज राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर आपण जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल दर -
- मुंबई - आज - 106.31, काल - 106.31
- पुणे - आज - 106.01, काल - 106.19
- नाशिक - आज - 106.70, काल - 105.81
- नागपूर - आज - 106.17, काल - 106.03
- कोल्हापूर - आज - 106.40, काल - 106.40
- औरंगाबाद - आज - 107.93, काल - 106.67
- सोलापूर - आज - 106.86, काल - 106.05
- अमरावती - आज - 107.15, काल - 107.15
- ठाणे - आज - 105.97, काल - 105.97
महाराष्ट्रातील आजचे डिझेल दर -
- मुंबई - आज - 94.27, काल - 94.27.31
- पुणे - आज - 92.53, काल - 92.70
- नाशिक - आज - 93.19, काल - 92.34
- नागपूर - आज - 92.72, काल - 92.58
- कोल्हापूर - आज - 92.93, काल - 92.93
- औरंगाबाद - आज - 95.88, काल - 93.17
- सोलापूर - आज - 93.37, काल - 92.59
- अमरावती - आज - 93.66, काल - 93.66
- ठाणे - आज - 92.47, काल - 92.47