मुंबई - मुंबईतील एका प्रतिष्ठित बिल्डरने मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याविरोधात आर्थिक व मानसिक त्रास देण्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संबंधित बिल्डरने एका फ्लॅटखरेदीसंदर्भात बर्वे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांच्यावर आर्थिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त बर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण -
मुंबईतील एका बांधकाम प्रकल्पातून दोन फ्लॅट मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व त्यांची पत्नी शर्मिला यांच्या नावावर 2014 मध्ये संजय बर्वे यांनी खरेदी केले होते. या दोन फ्लॅटची किंमत बाजारभावापेक्षा कमी करत तब्बल 1 कोटी 21 लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आलेला होता. मात्र, यासंदर्भात लागणारा टॅक्स बिल्डरने स्वतः भरलेला होता.
हेही वाचा - सांगा मुख्यमंत्री, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; खासदार अमोल कोल्हेंचा सवाल
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी 2014 मध्ये घेतलेले हे दोन फ्लॅट 2018 मध्ये विकण्याची तयारी सुरू केलेली होती व यासाठी त्यांनी बिल्डरला आग्रह धरलेला होता. बिल्डर मोहमद सिद्दीकी यांनी दोन्ही फ्लॅट 1 कोटी 21 लाख रुपयांना विकत घेण्याची तयारी दर्शवली. बिल्डरकडून 1 कोटी 21 लाख रुपये घेतल्यानंतर मात्र संजय बर्वे व त्यांच्या पत्नीने करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यास गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ सुरू केली आहे.
हेही वाचा - काँग्रेसने 70 वर्षांपासून दलितांना निवडणुकांपासून वंचित ठेवले - जे पी नड्डा
त्यामुळे आपला आर्थिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप या बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत असून 4 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.