मुंबई - राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी ( start first to fourth school ) आरोग्य विभागाकडून हिरवा कंदील ( Permission of health department to start school ) असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय -
टास्क फोर्स सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर राज्यात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत. मात्र शाळा सुरू करताना गुगली नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत दक्षता ठेवावी लागेल. अशा सूचना टास्क फोर्स कडूनही करण्यात आले आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच 12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत टास्क फोर्सने सूचना केल्या आहेत. याबाबत उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही राजेश टोपे यांनी वर्तवली.
मुलांच्या लसीकरणाला केंद्राने परवानगी द्यावी -
12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी कोरेक्स लस वापरण्यात यावी अशा बाबतचे मत तज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात मुबलक पुरवठा असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर 12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली आहे.
निर्बंध शिथिल करण्याचा विचार -
सध्या नाट्यगृह किंवा सिनेमागृहे 50 टक्के ने सुरू आहेत. मात्र भविष्यात अशीच स्थिती राहिली किंवा यापेक्षा ही स्थिती सुधारली तर निर्बंध अजूनही शिथिल करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. मात्र परिस्थिती सुधारत असली तरी कोविड बाबत चे सर्व नियम पाळले गेलेच पाहिजेत असं आवाहनही राजेश टोपे यांनी केला आहे.
हेही वाचा - Pawar at Pritisangam : एक दिवस आधीच शरद पवार प्रितीसंगमवर, यशवंतरावांना वाहिली आदरांजली