मुंबई - देशात कोरोना संकट वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने 3 ते 17 मेदरम्यान तिसरा लॉकडाऊन सर्वत्र लागू केला. मात्र यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले . यात दारूची दुकान कालपासून सुरू झाली आणि मुंबईतील दारू दुकानासमोर तळीरामनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. आज दुसऱ्या दिवशीही उपनगरातील चेंबूरमध्ये तळीरामांनी काल सारखीच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत कोरोना विषाणूच्या रुग्णात झपाटयाने वाढ होत असून मुंबई रेड झोनमध्ये आहे. गेले दीड महिना झाले तळीरामांचा घसा या दरम्यान कोरडा पडला होता. आज दुसऱ्या दिवशी चेंबूरच्या अमर महाल पुला शेजारील दुकानसमोर दारू खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी काही तळीराम सोशल डिस्टन्स शारीरिक अंतर पाळण्याचा नियम पायदळी तुडवत होते. तर अनेक जण रस्त्यावर गर्दी करत होते. यासाठी पोलिसांना बळाचासुद्धा वापर करावा लागत आहे.