ETV Bharat / city

भाजपमध्ये डर्टी पॉलिटिक्स नाही, विकासाच्या मुद्यांवर लोकांचा पक्ष प्रवेश - चंद्रकांत पाटील

इतर पक्षांमध्ये एकाला वर न्यायचे दुसऱ्याला खाली खेचायचे असे डर्टी पॉलिटिक्स चालते. मात्र भाजपमध्ये अशा डर्टी पॉलिटिक्सला स्थान नाही. भाजपमध्ये केवळ विकासाच्या मुद्यावर लोक येत आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

विकासाच्या मुद्यावर लोक भाजपात येत आहेत - चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jul 29, 2019, 8:14 PM IST

मुंबई - भाजपमध्ये अशा डर्टी पॉलिटिक्सला स्थान नाही. इतर पक्षांमध्ये एकाला वर न्यायचे दुसऱ्याला खाली खेचायचे असे डर्टी पॉलिटिक्स चालते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस 1 ऑगस्ट पासून महाजनादेश यात्रा काढत आहेत. या यात्रेच्या बोध चिन्हांचे पाटील यांच्या हस्ते भाजप प्रदेश कार्यालयात अनावरण करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.

विकासाच्या मुद्यावर लोक भाजपात येत आहेत - चंद्रकांत पाटील

भाजपमध्ये जे लोक येत आहेत ते विकासाच्या मुद्यावर येत आहेत - पाटील

भाजपने एकूण कार्यकाळात विरोधी पक्षाच्या कोणत्याही आमदाराला सापत्न वागणूक दिली नाही. सर्वांच्या विकास कामांचा निधी दिला आहे. आघाडी सरकारच्या काळात आमदारांना निधी साठी मंत्र्यांकडे फरफटत जावे लागत होते. भाजप सरकारने विकासाला प्राधान्य दिल्यामुळेच अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत, असे पाटील यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी आपली पोरं सांभाळावी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप दाबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना पाटील यांनी यात कोणतेही तथ्य नाही. त्यांचे नेते पक्ष का सोडत आहेत, याचाच विचार पवार यांनी करावा. त्यांची पोरं त्यांनी संभाळावीत उगाच दुसऱ्याला दोष देऊ नये, असे बोल पाटील यांनी पवारांना सुनावले आहेत.

येत्या 31 जुलैला गरवारे सभागृहात राज्यातले अनेक नेते भाजपात सामील होणार आहेत. यात अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश असेल असेही पाटील यांनी सांगितले आहे. मात्र भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नेत्यांची नावे मात्र त्यांनी गुदस्त्यात ठेवली आहेत.

Intro:भाजप मध्ये डर्टी पॉलिटिक्स नाही, विकासाच्या मुद्यावर लोक येत आहेत

मुंबई 29

इतर पक्षांसारखे एकाला वर न्यायचे दुसऱ्याला खाली खेचायचे असे डर्टी पॉलिटिक्स भाजप मध्ये चालत नाही, केवळ विकासाच्या मुद्यावर भाजप मध्ये लोक येत आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले . मुख्यमंत्र्यांची 1 ऑगस्ट पासून महाजनादेश यात्रा सुरू होत आहे, त्या यात्रेच्या बोध चिन्हांचे पाटील यांच्या हस्ते भाजप प्रदेश कार्यालयात अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

Body:भाजपच्या वर्षाच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या कोणत्याही आमदाराला सापत्न वागणूक दिली नाही. सर्वांना विकास कामांचा निधी दिला. आघाडी सरकारच्या काळात आमदारांना ही निधी साठी मंत्र्यांकडे फरफटत जावे लागत होते. पण या सरकारने विकासाला प्राधान्य दिल्याने अनेक लोक भाजप मध्ये येत आहेत. भाजपला ईडी किंवा आयकर विभागाच्या दबावही कोणतीही गरज नसल्याचा पुनरुच्चार ही पाटील यांनीं यावेळी केला.

शरद पवार यांनी आपली पोरं सांभाळावी.....

राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप दाबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे, पण त्यात तथ्य नाही. त्यांचे नेते पक्ष का सोडत आहेत. याचा विचार पवार यांनी करावा. त्यांची पोरं त्यांनी संभाळावीत उगाच दुसऱ्याला दोष देऊ नये असेही पाटील यांनी सुनावले.

येत्या 31 जुलै ला गरवारे सभागृहात राज्यातले अनेक नेते भाजपात सामील होणार आहेत. यात मोठ्या नेत्यांचा ही समावेश असेल असेही त्यांनी सांगितले. मात्र भाजपात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नेत्यांची नावे त्यांनी गुदस्त्यात ठेवली. दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाची चर्चा लवकरच अंतिम टप्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.