ETV Bharat / city

Bmc - भाजपच्या विरोधाला न जुमानता पेंग्विन देखभालीचा प्रस्ताव मंजूर - पेंग्विनला भाजपचा विरोध

महापालिकेत पेंग्विन गँग अस्तित्वात आली असून निविदा तयार करताना महापालिका अधिकाऱ्यांकडून एकाच कंत्राटदाराला अनुकूल ठरतील असे नियम जाणीवपूर्वक केले जातात. ऑक्सिजन प्लांटचेही कंत्राट 'या' एकाच निविदाकाराला मिळते हेही आश्चर्यकारक आहे.

penguin
पेंग्विन
author img

By

Published : Nov 29, 2021, 8:26 PM IST

मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान पालिकेचे उत्पन्न कमी झाल्याने पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असताना पालिका पेंग्विनवर कोट्य़वधीची उधळण का करते असा प्रश्न विचारत सोमवारी भाजपने स्थायी समितीत प्रस्तावाला विरोध केला. मात्र, भाजपच्या या विरोधाला न जुमानता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बहुमताने प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी याबाबतची निविदा रद्द करण्यात यावी अशी मागणी पालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पेंग्विनवर कोट्यवधी रुपयांची उधळण -
भायखळा राणी बागेतील पेंग्विन कक्षाच्या देखभाली साठी देण्यात आलेल्या कंत्राटाची मुदत संपली आहे. नवीन कंत्राट देण्यासाठी तीनवेळा टेंडर काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने आता जुन्याच ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले आहे. मे. हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला ४३ दिवसासाठी मुदतवाढ दिली असून त्यासाठी ४५.८४ लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. भाजपने या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली असताना अशा परिस्थितीत पेंग्विनवर कोट्यवधी रुपयांची उधळण कशासाठी असा सवाल केला. याबाबतच्या प्रस्तावाला पेंग्विनच्या माध्यमातून कंत्राटदाराच्या घशात पैसा टाकण्यासाठी आणि पेंग्विन गॅंगला पोसण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा वायफळ खर्च सत्ताधारी करत असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे सदस्य विनोद मिश्रा यांनी स्थायी समितीत केली. वीर जिजामाता उद्यानातील बहुतेक निविदा भ्रष्ट पद्धतीने भरलेल्या आहेत. यातून महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. सद्यस्थितीत पेंग्विनच्या देखभालीसाठी शिफारस करण्यात आलेल्या कंत्राटदाराला २०१६ मध्ये पेंग्विनच्या मृत्यूबद्दल काळ्या यादीत टाकले होते; आणि निकृष्ट कामासाठी त्याच्याकडून १.४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. अशा भ्रष्ट कंत्राटदाराला पुन्हा या प्रक्रियेत सामावून घेणे योग्य नाही, अशी टीका मिश्रा यांनी केली.

महापालिकेत पेंग्विन गँग -
महापालिकेत पेंग्विन गँग अस्तित्वात आली असून निविदा तयार करताना महापालिका अधिकाऱ्यांकडून एकाच कंत्राटदाराला अनुकूल ठरतील असे नियम जाणीवपूर्वक केले जातात. ऑक्सिजन प्लांटचेही कंत्राट 'या' एकाच निविदाकाराला मिळते हेही आश्चर्यकारक आहे. त्यामुळे या निविदा विशिष्ट कंत्राटदारासाठीच काढण्यात आल्या असल्याची शंका घेण्यास वाव मिळतो असा आरोपही भाजपने केला. दरम्यान भाजपच्या विरोधाला झुगारून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बहुमताने प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी पालिका आयुक्त व महापौरांकडे हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. सध्याचा पेंग्विन देखभालीचा खर्च प्रति दिन १०६६१३ एवढा असून त्याच कंत्राटदाराला सध्याच्या देखभाली खर्चापेक्षा ३० टक्के वाढीव खर्च (१,३९,३८२ प्रतिदिन ) देण्याचा घाट महापालिकेने घातला असून ही सरळसरळ जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. प्राणिसंग्रहालयाची कमाई कमी आणि खर्च अधिक असताना कायद्याचे उल्लंघन करून असे प्रस्ताव कसे काय मंजूर केले जातात हे अद्यापही समजू शकलेले नाही. त्यामुळे हा बेकायदेशीर प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने न्यायालयीन लढाई छेडली जाईल असा इशारा भाजपने दिला आहे.

काय आहे प्रस्ताव -
मुंबई महापालिकेने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून विदेशातून हंबोल्ट पेंग्विन पक्षी मुंबईतील राणी बागेत आणले. त्यांच्यासाठी अद्ययावत पेंग्विन कक्ष १८ मार्च २०१७ पासून सुरू करण्यात आला होता. या पेंग्विनची व कक्षाची विशेष देखभाल करण्यासाठी पालिकेने मे.हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला ३ वर्षांसाठी ११.४६ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. त्याची मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे पुढे कंत्राटदार नेमण्यासाठी पालिकेने तीन वेळा टेंडर काढले. तिन्ही वेळा एक, दोन कंत्राटदारांनीच प्रतिसाद दिला. त्यात जुनाच कंत्राटदार कंत्राट मिळविण्यासाठी प्रयत्नात राहिला. शिवाय टेंडरलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने पालिकेने नवीन कंत्राटाचा करारनामा होईपर्यंत जुन्याच कंत्राटदाराला ४३ दिवसासाठी कंत्राटकाम दिले. त्यासाठी त्याला ४५ लाख ८४ हजार रुपयांचा मोबदला दिला आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Daughter Marriage : मुलीच्या पाठवणीच्यावेळी संजय राऊत भावूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.