ETV Bharat / city

Patra Chawl Scam आता ईडीच्या निशाण्यावर कोण मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी Patra Chawl Scam Case ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता मुंबईत मोठी घडामोड समोर आली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईतील उपनगरात छापेमारी केली आहे. आज ( 17 ऑगस्ट ) सकाळी 11 वाजल्यापासून ही छापेमारी सुरु ED Carries Out Raids At Multiple Locations In Mumbai आहे.

sanjay raut
sanjay raut
author img

By

Published : Aug 17, 2022, 7:08 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने Patra Chawl Scam Case अटक केली आहे. त्यानंतर आता मुंबईत मोठी घडामोड समोर आली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईतील उपनगरात छापेमारी केली आहे. आज ( 17 ऑगस्ट ) सकाळी 11 वाजल्यापासून ही छापेमारी सुरु ED Carries Out Raids At Multiple Locations In Mumbai आहे.

संजय राऊत हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याचवेळी ईडीकडून कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांची चौकशी सुरु आहे. एकीकडे ईडीकडून चौकशी सुरु असताना दुसरीकडे मुंबईत धाडी टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता कोणाला अटक होणार?, कोणावरती कारवाई होणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान, राऊतांवर कारवाई झाल्यानंतर ही तिसरी छापेमारी आहे.

काय आहे पत्रा चाळ प्रकरण? - ईडीने पत्राचाळ प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना अटक केली होती. ते गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार सन २०१० मध्ये करण्यात आला होता.

त्यानंतर प्रवीण राऊत यांनी एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. तसंच याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १०७४ कोटी रुपये जमवले. पण, त्याचवेळी पत्राचाळीचा मात्र एक इंचदेखील पुनर्विकास केला नाही. त्याखेरीज याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले व त्या रकमेचा गैरवापर केला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांनी या घोटाळ्यातील ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केल्याचं सांगितलं जातं. तसंच या १०० कोटींपैकी ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचा आरोप आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray गद्दारांसोबत गेलेल्या निष्ठावंतांचाही गेम झाला, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.