मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर तयारी करत आहे. मात्र या रोगाला रोखण्यासाठी आता मर्यादा येऊ लागल्या आहेत. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा तर कुठं औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती. रुग्णांना सध्या रेमडेसिवीर या औषधाची गरज आहे. मात्र याच औषधाचा तुटवडा भासू लागल्याने जनता त्रस्त आहे.
मुंबईच्या भायखळा भागात असणाऱ्या मसिना रुग्णालयात रेमडेसिवीरसाठी नागरीक येत आहेत. मात्र रुग्णालयातच औषध नसल्यानं जनता त्रस्त आहे. याच रुग्णालयात औषध 20 तारखेपासून मिळणार असल्याचे बोर्ड लिहिले आहेत. त्यामुळं नागरिकांना 20 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडं ज्या रुग्णांचे काही डोस पेंडिंग आहेत. त्यांना उर्वरित डोससाठी 3 ते 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार