ETV Bharat / city

Konkani Travelers Mumbai : एसटीचा संप अन् कमी रेल्वे गाड्यांमुळे कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे हाल.. - एसटी संप महाराष्ट्र

होळीचा सण साजरा करण्यासाठी गेल्या दोन वर्षानंतर नागरिक मोठ्या संख्येने कोकणात गेले ( Konkani Travelers Mumbai ) आहेत. मात्र, एसटीचा संप ( ST Strike Maharashtra ) आणि कमी संख्येने असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे कोकणातून परत मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत ( Konkani Travelers ST Strike Less Trains ) आहेत.

एसटीचा संप अन् कमी रेल्वे गाड्यांमुळे कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे हाल..

author img

By

Published : Mar 20, 2022, 8:36 PM IST

मुंबई - मुंबईत राहणार्‍या कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवानंतर होळीचा सण अत्यंत महत्वाचा असतो. गेल्या दोन वर्षापासून कोरोनानंतर पहिल्यांदाच होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणत पोहचले ( Konkani Travelers Mumbai ) आहे. मात्र, आता परतीच्या प्रवासात कोकणातील नागरिकांना रेल्वेचा गर्दीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून आवश्यकतेपेक्षा कमी गाड्या सोडण्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्तापाला समोर जावे लागत आहे. एसटीचा संप ( ST Strike Maharashtra ) आणि कमी रेल्वे गाड्या सोडल्याने नाइलाजास्त चाकरमान्यांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागत ( Konkani Travelers ST Strike Less Trains ) आहे.

प्रवाशांना असुविधेचा सामना

कोरोनाच्या प्रादुर्भावाने मागील दोन वर्षांपासून कोकणात जाणाऱ्यांची संख्या कमी होती. यंदा निर्बंध शिथिल करण्यात आल्याने सणासुदीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता होळीसाठी गेलेल्या चाकरमान्यांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे. मात्र, चाकरमान्यांना रेल्वेचा गर्दीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच एसटीचा संप, खासगी बसचे वाढविलेले दर, त्यामुळे प्रवाशांना फक्त रेल्वेचा आधार होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून आवश्यकतेपेक्षा कमी गाड्या सोडण्यात आल्याने कोकणातील गाड्यांमधून प्रवाशांना धक्काबुक्कीचा प्रवास करावा लागला. आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांना गाडीत शिरण्यासाठी जागा नव्हती. रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना असुविधेचा सामना करावा लागला, असा आरोप चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे. एसटी महामंडळाने ऐन होळीचा तोंडावर १०० बसेस सोडल्या होत्या. मात्र, बसेस कमी असल्याने त्यांच्या फायदा सुद्धा चाकरमान्यांना झाला नाही. कारण आतापर्यत एसटीचा बसेस पूर्ण क्षमतेने सुरु झालेल्या नाहीत.

एसटीचा संप अन् कमी रेल्वे गाड्यांमुळे कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे हाल..
रेल्वे प्रशासनाकडून आवश्यकतेपेक्षा कमी गाड्या सोडण्यात आल्याने कोकणातील गाड्यांमधून प्रवाशांना धक्काबुक्कीचा प्रवास करावा लागला.

कोकणवासीयांकडे दुर्लक्ष

कोकण रेल्वे जागृत संघचे सचिव विलास पावसकर यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, पश्चिम रेल्वेने या वर्षी बोरिवलीवरून कोकणात जाणारी एकही रेल्वे गाडी सोडली नाही. त्यामुळे कोकणवासीयांची प्रचंड हाल झाले आहे. तसेच अनेक वर्षांपासून पश्चिम रेल्वे मार्गावर नियमितपणे कोकणात जाणारी एक गाडी होती. मात्र, आतापर्यत पश्चिम रेल्वेने अद्यापही ती गाडी सोडली नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोकणातील रेल्वे प्रवाशांची परिस्थिती माहित असताना त्यांच्याकडून कोणतेही उपयोजन केल्या गेल्या नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन कोणासाठी काम करते आणि काय करते असा प्रश्न उपस्थितीत होतोय. या वर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. याची संपूर्ण माहीत असताना रेल्वेने काय अतिरिक्त गाड्या सोडल्या नाही याचे उत्तर रेल्वेने कोकणवासियां द्यावेत असेही विलास पावसकर म्हणाले.

खासगी बसेसचे भाडे दुप्पट-तिप्पट

एकीकडे एसटीचा संप अद्यापही सुरु असल्याने एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही. तर दुसरीकडे रेल्वेच्या गाड्यांची संख्या न वाढविल्यामुळे खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी कोकणातून मुंबई येणाऱ्या प्रवाशांकडून दुप्पट ते तिप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. सावंतवाडी ते मुंबई शयनयान वातानुकूलित खासगी बसचे भाडे १७ मार्चपासून तीन हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे. तर विनावातानुकूलित आसनाचे भाडे दीड हजार ते १ हजार ६०० रुपयांपर्यंत आहे. गर्दीचा काळ सोडल्यास या मार्गावर वातानुकूलित शयनयानाचे भाडे प्रतिप्रवासी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये आणि विनावातानुकूलित आसनाचे दर ८०० रुपयांपर्यंत असतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.