मुंबई: मुंबईत दसऱ्यानिमित्त शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांचे दोन दसरा मेळावे Dussehra gathering of Shinde group and Uddhav Thackeray group आयोजित करण्यात आले असून या मेळाव्या करता होणाऱ्या गर्दीमुळे मुंबई पोलिसांनी Mumbai Police कायदा आणि सुरक्षा राखण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच सामान्य नागरिकांचे वाहतूक कोंडीमुळे हाल होऊ नयेत, म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने Mumbai Police देखील विशेष व्यवस्था केलेली आहे.
शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यानिमित्त 5 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन आणि राजा बढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शन दिलीप गुप्ते मार्ग पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी, गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण आणि उत्तर दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शन पर्यंतचा मार्ग आणि बाळ गोविंद दास मार्ग पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोड पासून पश्चिम दिशेला एलजे मार्गापर्यंत वाहनांसाठी बंद करण्यात येईल. वरील मार्ग बंद हा विशेष करून शिवाजी पार्क या दिशेने येणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येईल.
पार्किंगसाठी देखील खास व्यवस्था
बसेससाठी पार्किंग सेनापती बापट मार्ग दादर पश्चिम, कामगार मैदान प्रभादेवी, सेनापती बापट मार्ग
कारसाठी पार्किंग इंडियाबुल फायनान्स सेंटर प्रभादेवी, इंडियाबुल वन सेंटर प्रभादेवी, कोहिनूर स्क्वेअर दादर पश्चिम ही व्यवस्था पश्चिम आणि उत्तर उपनगरातून येणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे. तर पूर्व उपनगरातून म्हणजेच ठाणे, नवी मुंबई येथून पूर्व द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांना वाहनासाठी खालील प्रमाणे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
बसेससाठी पार्किंग माटुंगा येथील फाईव्ह गार्डन आणि नाथालाल पारेख मार्ग येथे करण्यात आली आहे. तसेच माटुंगा पूर्व येथील एडनवाला रोड आणि वडा पश्चिम येथील आरएके रोड येथे बसेसच्या पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबईकडून मिळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसेससाठी पार्किंगची सोय प्रभादेवी येथील आप्पासाहेब मराठी मार्ग येथे करण्यात आली आहे. तर कारसाठी पार्किंगची व्यवस्था इंडिया इंटरनॅशनल सेंटर आणि इंडियाबुल वन सेंटर प्रभादेवी येथे करण्यात आली आहे.
कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी त्याचप्रमाणे वांद्रे पूर्व येथील बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि सर्वसामान्यांचे हाल होऊ नये. म्हणून मुंबई पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग धारावी, वरळी सीलिंगकडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणारा सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग बंद असणार आहे. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकिया पॅलेस वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरिता प्रवेश बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे सर्वे जंक्शन व रजाक जंक्शनवरून बीकेसी परिसर धारावी, वरळी सीलिंगच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंद करण्यात येईल. पूर्वद्रुतगती महामार्ग चुनाभट्टीवरून बीकेसीच्या दिशेने जाणारा सर्व वाहनांना कनेक्टर ब्रिज चढण दक्षिण वाहिनी येथून जाण्याकरता मार्क बंद राहील.
बेसमेंट पार्किंग येथे व्यवस्था शिंदे गटाचा होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बीकेसी येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग धारावी, वरळी सीलिंगकडून मिळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांसाठी बसेस पार्किंगसाठी फॅमिली कोर्ट पाठीमागील बाजू वाया जेतवन बिल्डिंग ते इन्कम टॅक्स जंक्शनपर्यंतची मोकळी जागा, कॅनरा बँकेजवळील एमएमआरडीए पे अँड पार्किंग, पंजाब नॅशनल बँक समोरील मोकळे मैदान फटाका मैदान, कॅनरा बँकेसमोरील मैदान एमएमआरडी ऑफिससमोरील मोकळी जागा, जियो गार्डन जवळील एमएमआरडीए पे अँड पार्क अशी व्यवस्था असेल, तर कारच्या पार्किंगसाठी बीकेसी येथील जिओ गार्डन बेसमेंट पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे.