मुंबई - महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांच्या निर्देशानुसार, वरळी येथील घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात ( Worli Gas Cylinder Blast ) जखमी झालेल्या विष्णू पुरी या लहान मुलाचे छत्र हरपल्याने आई वडीलाविना हाल-अपेष्टा होऊ नये म्हणून आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर यांनी ( Shivsena Adopts Vishnu Puri ) घेतला. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar ) यांनी आज कस्तुरबा रुग्णालयात जाऊन पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत विष्णूच्या आजोबांकडे सुपूर्त ( ShivSena Helps Gas Explosion Victim ) केली. याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत पवार उपस्थित होते.
-
Rs 5,000-10,000 will be sent to his account every month. We'll bear expenses of his education. He is now Shiv Sena's responsibility: Mumbai Mayor Kishori Pednekar
— ANI (@ANI) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rs 5,000-10,000 will be sent to his account every month. We'll bear expenses of his education. He is now Shiv Sena's responsibility: Mumbai Mayor Kishori Pednekar
— ANI (@ANI) February 22, 2022Rs 5,000-10,000 will be sent to his account every month. We'll bear expenses of his education. He is now Shiv Sena's responsibility: Mumbai Mayor Kishori Pednekar
— ANI (@ANI) February 22, 2022
पाच ते सहा वेळेस प्लास्टिक सर्जरी
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कस्तुरबा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवृंद यांनी घेतलेल्या मेहनतीला यश येऊन हे बाळ बरे झाले आहे. पाच ते सहा वेळा विष्णूवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्यानंतर लहान बाळाची चांगली सुश्रुषा केल्याबद्दल महापौरांनी रुग्णालयातील सर्व संबंधितांचे आभार मानले. त्याचप्रमाणे विष्णूने आपले पुण्यातील आजोबा यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विष्णूच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले आहे. ही संपूर्ण आर्थिक मदत या खात्यामध्ये जमा होणार आहे. विष्णू वयाची अठरा वर्षे पूर्ण करेपर्यंत त्याच्या देखभालीचा खर्च मिळणाऱ्या व्याजातून करण्यात येईल. त्यासोबतच विष्णूचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शिवसेना पक्ष करणार आहे. याव्यतिरिक्त दर महिन्याला सीएसआरमधून विष्णूला आर्थिक मदत करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रला ( Bank Of Maharashtra ) पत्र देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. विष्णूला आई-वडिलांसारखंच प्रेम द्या, चांगला सांभाळ करा, तसेच आम्ही वेळोवेळी त्याला भेटून त्याची संपूर्ण काळजी घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापौरांनी विष्णूला कपडे व खेळण्याचे साहित्य प्रदान केले.
'अशी' घडली दुर्दैवी घटना
वरळी बीडीडी चाळीतील ( BDD Chawl Worli ) एका घरात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत पुरी कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. या जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वेळेवर उपचार न मिळाल्याने तिघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १ डिसेंबरला चार महिन्याचे बाळ मंगेश पुरी याचा मृत्यू झाला. ४ डिसेंबर रोजी वडिल आनंद पुरी यांचा मृत्यू झाला. तर ६ डिसेंबरला विद्या पुरी यांचा मृत्यू झाला. तर विष्णू पुरी ( ५ महिने ) हा २० टक्के भाजल्याने त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला.